Video | कामातून ब्रेक, नेहा कक्कर गर्भवती असल्याची चर्चा, एअरपोर्टवर लूक पाहून चाहते आणखी बुचकळ्यात!

| Updated on: Jul 15, 2021 | 11:22 AM

ल्या काही दिवसांपासून नेहा कक्करने कामातून ब्रेक घेतला आहे. ती इंडियन आयडॉल 12 शोमधून देखील गायब झाली होती. तिच्या जागी बहीण सोनू कक्कर शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.

Video | कामातून ब्रेक, नेहा कक्कर गर्भवती असल्याची चर्चा, एअरपोर्टवर लूक पाहून चाहते आणखी बुचकळ्यात!
नेहा-रोहनप्रीत
Follow us on

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान गेल्या वर्षी गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) यांचे लग्न झाले होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडते. गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्करने कामातून ब्रेक घेतला आहे. ती इंडियन आयडॉल 12 शोमधून देखील गायब झाली होती. तिच्या जागी बहीण सोनू कक्कर शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.

गेल्या काही काळापासून कार्यक्रम आणि कामांतून ब्रेक घेतल्यानंतर नेहा व पती रोहनप्रीत सिंग याच्यासह बुधवारी विमानतळावर दिसली होती. यादरम्यान नेहाने एक सैल टी-शर्ट व पॅन्ट परिधान केले होते. नेहाने ब्लॅक सनग्लासेससह ब्लॅक मास्क देखील घातला होता. या लूकमध्ये नेहाला पाहून चाहते आपली लाडकी गायिका गर्भवती असल्याचा अंदाज वर्तवत आहेत.

या चर्चित व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहते प्रश्नांचा भडीमार करत आहेत, आपण गर्भवती आहात का? विचारत आहेत. तर कोणी म्हणत आहे की, नेहाने ज्याप्रकारे पोशाख परिधान केला आहे कदाचित ती गर्भवती आहे, असे म्हणत आहेत.

त्याच वेळी रोहनप्रीत नेहाची खूप काळजी घेताना दिसला. तो तिचा हात धरून चालत होता आणि त्याने नेहाला आधी गाडीत बसवलं आणि मग स्वत: बसला. यापूर्वी दोघांनीही फोटोग्राफर्ससाठी फोटो पोज दिल्या.

पाहा व्हिडीओ

वजन कमी करण्यासाठी जोरदार तयारी!

काही दिवसांपूर्वी नेहाने स्वत:चा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की तिला आधीसारखे व्हावे, असे वाटत आहे. नेहाने लिहिले की, ‘मला पुन्हा असे दिसावेसे वाटते, मला माहित आहे की माझे 1 किलो वजन कमी झाले आहे. मात्र, अद्याप 5 किलो कमी करणे बाकी आहे.’

तिचा हा व्हिडिओ इंडियन आयडॉलच्या या पर्वाच्या सुरूवातीचा आहे. तसे, नेहाने यापूर्वीच सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात ती वजन कमी करण्यासाठी खूप व्यायाम करत आहे.

60 मिलियन फॉलोअर्स

तसे, नेहाची फॅन फॉलोव्हिंग एखाद्या मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही. ती भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी पहिली गायिका आहे. इतकेच नव्हे तर, नेहाने अलीकडेच दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनाही मागे टाकले आहे. नुकतेच इंस्टाग्रामवर नेहाचे 60 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत, ज्यांचा आनंद तिने नुकताच पती रोहनसमवेत साजरा केला. प्रियंका चोप्रा आणि श्रद्धा कपूरनंतर नेहा कक्कर इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी महिला सेलिब्रिटी आहेत.

(Fans assuming that Neha kakkar is pregnant when she spotted at airport with husband)

हेही वाचा :

KL Rahul-Athiya Shetty | इंग्लंडमध्ये एकत्र नांदतायत क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी, जॅकेटने केली पोलखोल!

आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड विरोधात रान पेटवलं, तेव्हा ही अभिनेत्री कुठे होती? : तृप्ती देसाई