मुंबई : अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यामधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. दोघीपण खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर यांचा वाद आता थेट पोलिस स्टेशनपर्यंत जाऊन पोहचलाय. साजिद खान बिग बाॅसच्या घरात गेल्यापासून शर्लिन चोप्रा गंभीर आरोप करताना दिसत आहे. साजिद खानच्या समर्थनार्थ राखी सावंत मैदानात उतरलीये. मात्र, आता राखी सावंत आणि शर्लिनमध्येच एक मोठा वाद सुरू झालाय.
साजिद खान आणि सलमान खान याच्यावर शर्लिन चोप्राने गंभीर आरोप लावल्यानंतर त्यांच्यासाठी पुढे येत, राखी सावंत म्हणाली की, साजिद खान निर्दोष आहे, ही शर्लिन चोप्रा काहीही आरोप लावते. इतकेच नाही तर या वादामध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा देखील पडला होता आणि शर्लिन स्वत: चे अश्लील व्हिडीओ तयार करून अपलोड करते. मात्र, नाव दुसऱ्यांवर घालते, असे राज कुंद्रा म्हणाला होता.
आता यासर्व प्रकरणात शर्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये शर्लिनने आरोप केला आहे की, एका पत्रकार परिषद दरम्यान राखी सावंत आणि फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी अश्लील व्हिडीओ दाखवताना माझ्यासाठी चुकीचे शब्द वापरले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी विनयभंग आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता राखी सावंत पुढेचे पाऊल काय उचलते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.