मुंबई : बिग बॉस 16 च्या घरात जोरदार हंगामा होताना दिसतोय. गाैतम गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन होण्यासाठी स्वप्न पाहात होता. कॅप्टन बनण्यासाठी गाैतम काहीही करण्यास तयार होता. नाॅमिनेशनपासून वाचण्यासाठी फक्त गाैतमला घराचा कॅप्टन बनायचे होते. सलमान खान गाैतमला म्हणतो की, तुला नाॅमिनेशनपासून वाचायचे असेल आणि घराचा कॅप्टन बनायचे असेल तर घरामध्ये जेवढे राशन आहे, तेवढे सर्व तुला जमा करावे लागेल. घरातील सदस्यांना उपाशी राहवे लागेल. धक्कादायक म्हणजे गाैतम नाॅमिनेशनपासून वाचण्यासाठी यासाठी होकार देखील देतो.
Shalin ne kiye apne vichaar vyakt. Salman Khan nahi hai unke iss safaayi se raazi. ?
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9.30 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot#BB16 #BiggBoss #ShanivaarKaVaar@BeingSalmanKhan pic.twitter.com/Y1BLvRinNB
— Bigg Boss (@BiggBoss) October 29, 2022
बिग बाॅसच्या घराचा कॅप्टन बनण्यासाठी गाैतम घरातील सर्व राशन देतो. गाैतमचा हा निर्णय ऐकल्यावर घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसतो. म्हणजे आता घरातील सदस्यांकडे काहीच राशन उरले नाहीये. गाैतमच्या या निर्णयानंतर घरातील सर्वच सदस्य त्याचा जोरदार समाचार घेतात. यामुळे घरात मोठा वाद देखील होतो.
घरातील सदस्यांनी गाैतमच्या निर्णयाचा विरोध केल्यावर गाैतम बिग बाॅसला परत म्हणतो की, हा निर्णय मी चुकीचा घेतला आहे. घरातील राशन घेऊन जाऊ नका आणि मला कॅप्टन बनायचे नाहीये. पण बिग बाॅस गाैतमला स्पष्ट सांगतात की, तुला तू घेतलेला निर्णय परत घेता येणार नाहीये.
Ghar mein hui ration ki improper division, jisse khadi huyi logon ke beech daraar. ?
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9.30 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot#BB16 #BiggBoss@BeingSalmanKhan@TRESemmeIndia @Chingssecret @MyGlamm pic.twitter.com/8jZF5cwASE
— Bigg Boss (@BiggBoss) October 29, 2022
आता बिग बाॅसच्या घरात राशन नसल्याने मोठा हंगामा होणार हे नक्की आहे. गेल्या काही दिवसांपासून गाैतम बिग बाॅसच्या घराचा कॅप्टन बनण्यासाठी मरमर करताना दिसत होता. मात्र, गाैतमचा हा निर्णय त्याच्या फॅन्सला पण अजिबात आवडलेला दिसत नाहीये. गाैतमच्या या निर्णयानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.