मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ (Hemangi Kavi) हिने सोशल मीडियावर एक धडधडीत पोस्ट लिहित ‘ब्रा’ सारख्या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयावर व्यक्त होण्याचे धाडस दाखवले. यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी अभिनेत्रीला आपला पाठींबा दर्शवत या पोस्टवर व्यक्त होण्यास सुरुवात केली. बाईने काय घालावं, हा तिचा प्रश्न असल्याचे म्हणत हेमांगी कवीने आपल्या भावना मांडल्या होत्या. मात्र, हेमांगी कवीच नाही तर एका हॉलिवूड अभिनेत्रीनेही ‘ब्रा’विरोधात एल्गार केला होता.
गिलियन अँडरसन (Gillian Anderson) या हॉलिवूड अभिनेत्रीने देखील या विषयावर बेधडक वक्तव्य केले होते. ‘माझे स्तन बेंबी पर्यंत गेले तरी चालतील, मला फरक पडत नाही. मी ब्रा घालणार नाही’, असे गिलियन अँडरसनने बेधडकपाने म्हटले होते. हेमांगीच्या या पोस्ट नंतर आता गिलियन अँडरसनचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. गिलियन अँडरसनने एका मुलाखती दरम्यान या विषयावर आपले मत व्यक्त केले होते.
GILLIAN ANDERSON DOESN’T WEAR BRAS ANYMORE. EVERYBODY CLAPPED EVERYBODY SCREAMED pic.twitter.com/lRvNGYHPHx
— melanie (@blnchdubois) July 12, 2021
गिलियन अँडरसन ही एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे. अमेरिकेतील शिकागो शहरात जन्मलेल्या गिलियन अँडरसन यांनी ‘द हाउस ऑफ मिर्थ’, ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड’, ‘द मायटी’, ‘द एक्स फाइल्स’ आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
महिलांनी देखील यावर व्यक्त व्हावं हे सांगताना हेमांगी म्हणाली की, कालच्या पोस्टनंतर अनेकांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं. मला आवडलं. पण इतकीशी गोष्ट बोलण्यासाठी धाडस लागत, हेच मुळात वेगळं होतं. ब्रा म्हणजे एक साधा कपड्याचा भाग आहे, त्यात धाडसाचं काय? पण इथूनच खरी सुरुवात आहे. मला वाटलं की काही बायका तरी असं म्हणतील की, तुझी ही पोस्ट वाचून मीही ब्रा घालणार नाही. पण असं धाडस अजूनही कोणी केलेलं नाही. खूप स्ट्रगल बाकी आहे आपला. मुलींनी स्वतःहून पुढे येऊन याबद्दल बोललं पाहिजे, की हो मी ब्रा वापरणार नाही. आणि कोणी बोललंच तर, ती बेधडकपणे उत्तर देईल. लाजणार नही आणो ओढणी वैगरे घेऊन गप्प बसणार नाही!
हेमांगीच्या या बेधडक पोस्ट नंतर नेटकऱ्यांनीही तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. या दरम्यान अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तर, अनेक कलाकारांनीही हेमंगीचे खूप कौतुक केले आहे. अनेक कलाकारांनी तिची ही पोस्ट शेअर केली आहे.
(Gillian Anderson declares she won’t wear a bra again after lockdown)
‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!