Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते यांनी आणला गाढव, थेट सलमान खानला या संघटनेने लिहिले पत्र

| Updated on: Oct 10, 2024 | 11:12 AM

bigg boss 18 contestants : पेटा ही प्राण्यांसाठी काम करणारी एक गैर-सरकारी संस्था म्हणजेच एनजीओ आहे. प्राण्यांवर समाजात होणारे अत्याचार थांबवण्याचे काम ती करते. बिग बॉसमध्ये गाढवाच्या वापर होत असल्यामुळे आता पेटा टीमने निर्मात्यांनासुद्धा पत्र लिहिले आहे.

Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते यांनी आणला गाढव, थेट सलमान खानला या संघटनेने लिहिले पत्र
Follow us on

रियलिटी शो बिग बॉसचा 18 वा सीजन सुरु झाला आहे. बिग बॉसच्या घरात वकील गुणरत्न सदावर्ते यांची स्पर्धक म्हणून एन्ट्री झाली आहे. त्यांनी त्या घरात गाढव आणले आहे. पेटा (People for the Ethical Treatment of Animals ) या संघटनेने थेट सलामान खानला पत्र लिहिले आहे. या शोमध्ये मनोरंजनासाठी कोणत्याही प्राण्याचा वापर करु नये, असे पेटाने म्हटले आहे. गाढवाच्या वापर टाळल्यामुळे प्राण्यांवर दबाव होणार नाही आणि प्रेक्षकांसाठी आदर्श ठरले. तसेच तो गाढव पेटाकडे सोपवावा, अशी मागणी या पत्रात केली आहे. बिग बॉसच्या शोमधून सुटका झालेल्या गाढवाला आम्ही अभयारण्यात पाठवू. यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांचे चाहतेही खूश होतील.

कुटुंबातील सदस्य करतात सांभाळ

पेटा इंडियाने सलमान खान आणि रिॲलिटी शो बिग बॉसच्या निर्मात्यांना मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशी विनंती पत्रातून केली आहे. ‘बिग बॉस 18’ मध्ये एका गाढवाला स्पर्धक म्हणून आणण्यात आले आहे. त्याचे नाव गधराज आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळून या गाढवाचा सांभाळ करावा लागतो. त्याला​पेटाने आक्षेप घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

प्राण्यांचा वापर शोमध्ये नको

‘बिग बॉस हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. परंतु त्यात प्राण्यांचा वापर करुन मनोरंजन करणे चुकीचे आहे. गाढवसाठी शोच्या सेटवर लावण्यात आलेले लाईट, त्या ठिकाणी होणारा आवाज हे सर्व भीतीदायक आहेत. कोणत्याही टीव्ही शोमध्ये प्राण्यांचा वापर करु नये. गाढव हा एक सामाजिक प्राणी आहे. तो त्यांच्या कळपात राहतो. सदावर्ते गाढवाच्या दुधावर संशोधन शोमध्ये करत असल्याचा दावा करतात. परंतु गाढवाचे दूध फक्त त्याच्या मुलांसाठीच असते. बिग बॉसमध्ये प्रथमच प्राणी येत नाही. यापूर्वी कुत्रा, पोपट, एक मासा स्पर्धेक म्हणून आणल्याचे पेटाने पत्रात म्हटले आहे.

पेटा काय आहे?

पेटा ही प्राण्यांसाठी काम करणारी एक गैर-सरकारी संस्था म्हणजेच एनजीओ आहे. प्राण्यांवर समाजात होणारे अत्याचार थांबवण्याचे काम ती करते. बिग बॉसमध्ये गाढवाच्या वापर होत असल्यामुळे आता पेटा टीमने निर्मात्यांनासुद्धा पत्र लिहिले आहे. पेटाकडे लोकांनीही गाढव शोमध्ये वापर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या तक्रारी केल्या आहेत.