मुंबई : ‘बिग बॉस 14’ फेम अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) अलीकडेच स्टंट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये दिसला होता. आज (27 सप्टेंबर) अभिनवच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
टीव्ही अभिनेता अभिनव शुक्ला ‘बिग बॉस 14’ पासून घराघरांत प्रसिद्ध झाला आहे. या शोनंतर त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनव नेहमीच त्याच्या चांगल्या लुक्समुळे चर्चेत असतो. अभिनव त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. ज्यामुळे चाहते त्याचे दिवाने आहेत. आज (27 सप्टेंबर) अभिनव 39वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनवच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्यासंबंधी काही खास गोष्टी जाणून घेऊया…
अभिनवचा जन्म 27 सप्टेंबर 1982 रोजी लुधियाना येथे झाला. त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. अभिनव एक उत्तम अभिनेता आहे आणि त्याला अनेक साहसी स्टंट देखील कार्याला आवडतात.
अभिनव शुक्ला याने 2004 पासून मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, त्याने त्याच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील एक फोटो शेअर केला आणि सांगितले की दोघांनीही आपल्या मॉडेलिंग करिअरला एकत्र सुरुवात केली होती. त्यांनी एकत्र Gladrags Manhunt आणि Megamodel स्पर्धेत भाग घेतला होता. सिद्धार्थ शुक्ला या स्पर्धेत उपविजेता ठरला होता.
अभिनवने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘जर्सी नंबर 10’ या मालिकेने केली. त्याने ‘जाने क्या बात हुई’, ‘गीत-हुई सबसे पराई’, ‘एक हजार में मेरी बेहना है’, ‘बदलते रिश्तों की दास्तान’, ‘सिलसिला बदलते रिश्तो का’, ‘दिया और बाती हम’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
अभिनेता अभिनव शुक्ला अनेक रिअॅलिटी शोचा देखील भाग बनला आहे. तो ‘खतरा खतरा खतरा’, ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’चा भाग देखील होता. या शोमध्ये त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
अभिनवने टीव्ही इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडमध्येही काम केले आहे. त्याने ‘रोर’, ‘अक्सर 2’ आणि ‘लुका चुप्पी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय, तो पत्नी-अभिनेत्री रुबीना दिलैकसोबत अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही दिसला आहे.
अभिनव शुक्लाला साहसी स्टंट आवडतात. तो अनेकदा ट्रेकिंगला जातो. अभिनवला प्रवासाची खूप आवड आहे, तो त्याची पत्नी रुबीनासोबत सहलीला जात राहतो. ज्याचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
Akshay Kumar : अक्षय कुमारचा फोटो बघून चिडले आयपीएस अधिकारी, म्हणाले- ‘असं होत नाही सर …’