मुंबई : बॉलिवूड चित्रपट आणि टीव्हीचे प्रसिद्ध अभिनेते मनोज पाहवा (Manoj Pahwa) यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्याने टीव्हीबरोबरच अनेक दमदार चित्रपटांमध्ये भरपूर काम केले आहे. आज (1 सप्टेंबर) अभिनेता त्याचा 58वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या चित्रपटांची यादी मोठी आहे, जिथे त्याने आजपर्यंत 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता मनोज पाहवा बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे.
मनोज यांनी बॉलीवूड चित्रपट “इस रात की सुबह नही”द्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या चित्रपटातून त्याला फारसे यश मिळाले नाही, पण त्याने अभिनेत्याची दखल घेतली गेली. पण अभिनेता याआधीच टीव्हीवरील त्याच्या मालिकांबद्दल चर्चेत होता. मनोजला प्रथम भारतातील प्रसिद्ध सीरियल “हम लोग”मध्ये संधी मिळाली. या मालिकेत त्याने टोनी नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना मालिकेतील त्याचे काम खूप आवडले.
2000पर्यंत, अभिनेत्याने अनेक मोठ्या मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर 2001मध्ये टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या पंकज कपूरच्या ‘ऑफिस-ऑफिस’ शोने मनोजला सर्वत्र हिट केले. मनोजने ‘ऑफिस-ऑफिस’मध्ये ‘भाटियाजीं’ची भूमिका साकारली. जी सर्वांना खूप आवडली. मनोज अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, जिथे अलीकडेच आपण त्याला क्रिती सॅननच्या प्रसिद्ध चित्रपट “मिमी”मध्ये पाहिले.
मनोज मूळचा पंजाबचा आहे. त्याचे वडील पाकिस्तानातव्याप्त पंजाबमधून स्वातंत्र्यानंतर भारतात आले आणि दिल्लीत राहू लागले. मनोजनेही आपले संपूर्ण शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आणि आता तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह वर्सोवा, मुंबई येथे राहतो.
‘हम लोग’च्या सेटवर मनोज सीमा भार्गवच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर या जोडीने लग्न केले. कामगिरीच्या बाबतीत हे दोन्ही स्टार्स कोणापेक्षाही कमी नाहीत. चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी या अभिनेत्याला फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकनही मिळाले आहे.
मनोजने सलमान खानसोबत “दबंग 2″मध्ये देखील काम केले आहे, ज्यात त्याने पोलीस कमिशनरची भूमिका साकारली होती. यावेळी खुद्द सलमान खाननेही मनोजचे खूप कौतुक केले होते. सलमानने त्याच्या कॉमिक टायमिंगचे कौतुक केले आहे. मनोजने चित्रपट आणि टीव्हीमध्ये खूप काम केले आहे, त्यानंतर आता हा कलाकार मालिकांमध्ये काम करत आहे. 2020मध्ये रिलीज झालेल्या “ए सुटेबल बॉय” चित्रपटातही अभिनेता दिसला होता. आजही प्रेक्षक मनोजने ‘ऑफिस-ऑफिस’मध्ये केलेल्या कामाचे कौतुक करत असतात. जिथे आजही हा शो बऱ्याच घरांमध्ये मोठ्या प्रेमाने पाहिला जातो.
Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी-राज कुंद्राचं नातं तुटण्याच्या वळणावर? जवळच्या मैत्रिणीने उलगडलं गुपित