मुंबई : ‘बडे अच्छे लगते हैं’ आणि ‘कसम से’ या टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) याचा जन्म 1 सप्टेंबर 1973 रोजी झाला. राम कपूरने अनेक चित्रपटांमध्ये तसेच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रत्येक पात्रासाठी तो प्रेक्षकांना आवडतो. रामने ‘कसम से’ या मालिकेत जय वालियाची भूमिका साकारली होती. हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले. राम कपूरच्या या मालिकेत प्राची देसाई मुख्य भूमिकेत होती.
राम कपूरचे वजन सुरुवातीपासूनच खूप जास्त होते. पण त्याचे वजन वाढलेले असूनही, राम कपूरला त्याच्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. राम कपूर सोनी टेलिव्हिजनच्या ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. राम कपूरसोबत अभिनेत्री साक्षी तंवरही या मालिकेत होती. यामध्ये दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. या मालिकेत राम कपूरने वयाच्या 40व्या वर्षी एक इंटीमेट सीन केला होता. या दृश्याची खूप चर्चाही झाली होती. अवघ्या 17 मिनिटांच्या या दृश्याने बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, राम कपूरने आता त्याच्या फिटनेसवरही खूप मेहनत घेतली आहे. 2017मध्ये राम कपूरने जिममध्ये घाम गाळताना बरेच फोटो शेअर केली. त्याच्या या शरीर परिवर्तनामुळे त्याचे चाहतेही खूप प्रभावित झाले. रामने यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्याने 6 महिन्यांत 25-30 किलो वजन कमी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. जे त्याने वेळेत पूर्णही केले.
रामच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर रामची कारकीर्द 1989च्या ‘हिना’ या मालिकेने सुरू झाली. यानंतर राम कपूर अनेक मालिकांमध्ये दिसला. 14 फेब्रुवारी 2003 रोजी राम कपूरने गौतमी गाडगीळशी लग्न केले. ‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली. इथेच दोघांमध्ये प्रेम फुलले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राम आणि गौतमी यांना अक्ष कपूर आणि सिया कपूर ही दोन मुलेही आहेत.
राम कपूरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘कसम से’, ‘बड़े अच्छे लगते हैं’, ‘कर ले तू भी मोहब्बत’, ‘दिल की बातें दिल ही जाने’, ‘घर एक मंदिर’, ‘कभी आये ना जुदाई’ या काही मुख्य मालिका आहेत. याशिवाय तो ‘हमशकल्स’, ‘लवयात्री’, ‘कुछ कुछ लोचा है’, ‘मेरे डॅड की मारुती’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. तर, आता राम कपूर देखील ‘अभय’ आणि ‘अभय 2’ सारख्या वेब सीरीजने आपल्या चाहत्यांची मने जिंकत आहेत.
Deepika padukone | दीपिका पदुकोणची पुन्हा हॉलिवूडकडे धाव, नव्या चित्रपटातून पुन्हा करणार धमाल!
शहनाज गिल बनली ‘बेबी डॉल’, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले घायाळ!