मुंबई : टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. ‘भाभी जी घर पर है’ या टीव्ही मालिकेत ‘गोरी मेम’ अर्थात ‘अनिता भाभी’ची भूमिका साकारून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज सौम्या तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.
सौम्याचा जन्म 3 नोव्हेंबर 1984 रोजी भोपाळमध्ये झाला. ‘भाभी जी घर पर हैं’ या शोमधून सौम्या टंडनला वेगळी ओळख मिळाली आहे. पण, आता तिने या शोचा निरोप घेतला आहे. आज सौम्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही खास गोष्टी सांगत आहोत. सौम्याने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने 2007 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. ती करीना कपूरसोबत ‘जब वी मेट’ या चित्रपटात दिसली होती.
सौम्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने अनेक रिअॅलिटी शो आणि मालिकांमध्येही काम केले. तिने ‘जोर का झटका’, ‘बोर्नविटा क्विझ’ आणि ‘डान्स इंडिया डान्स’ हे शो होस्ट केले आहेत. अनेक शो होस्ट केल्यानंतर तिने ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेत काम केले. या शोमधली ‘गोरी मेम’ अर्थात ‘अनिता भाभी’ ही तिची व्यक्तिरेखा खूप आवडली होती. या पात्राने अनिताला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. एवढेच नाही तर, या व्यक्तिरेखेसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
ज्या शोमधून सौम्याला प्रसिद्धी मिळाली, आरोग्याचे कारण देत तिने हा शो सोडला होता. सौम्याने कोरोनाच्या काळात आपली तब्येत चांगली ठेवत शोला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना काळात शूटिंग सुरू झाल्यानंतरच ती शो सोडण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.
मात्र, सौम्याने हे वृत्त चुकीचे म्हणत फेटाळून लावले होते. ती म्हणाली होती की, पैसे नाही तर, कोरोना आणि काही वाद होते, त्यामुळे मी या शोला अलविदा केला होता. एक कलाकार म्हणून मी हा निर्णय घेतला. मला वाटतं त्यामुळेच माझ्या टीमने मला समजून घेतलं. मी माझ्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम केले आणि प्रसूतीच्या 4 महिन्यांनंतरच कामावर परत आले होते. या शोसाठी पुन्हा शरीरयष्टी बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. कारण अभिनेत्री म्हणून ते खूप महत्त्वाचे होते.
‘मन उडु उडु झालं’, दिवाळीचं निमित्त साधत ‘इंद्रा’ आणि ‘दिपू’ने घेतली राज ठाकरेंची भेट!