मुंबई : बालपणी जेव्हा बहुतेक मुले कोणत्या ना कोणत्या खेळात गुंतलेली असत, त्यावेळी एक 6 वर्षाचा मुलगा शेतापासून दूर स्वयंपाकघरात आपल्या आयुष्याची स्वप्ने बघत होता. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून, अमृतसरचा रहिवासी असलेला स्टार शेफ विकास खन्ना (Vikas Khanna) आहे, ज्यांनी हातगाडीवरून आपला स्वयंपाकाचा छंद अवघ्या जगासमोर आणला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया, शेफ विकास खन्ना यांची एक अशी यशोगाथा आहे, जी तुम्हालाही प्रेरणा देईल.
स्टार शेफ विकास खन्ना यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1971 रोजी अमृतसर येथे झाला. आज ते जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. फार कमी लोकांना माहित असेल की, विकास खन्ना यांचा जन्म झाला तेव्हा ते अपंग होते, ते आपल्या पायावर नीट उभे राहू शकत नव्हते. यामुळेच ते स्वयंपाक घरात आई आणि आजीसोबत तासन् तास बसायचे, जिथून त्यांचा स्वयंपाकाचा प्रवास सुरू झाला.
विकास यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली. सर्वप्रथम विकासने त्याच्या घराच्या मागे एक छोटा बँक्वेट हॉल उघडला. मात्र या कामात त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यांनी आणखी अनेक व्यवसाय सुरू केले, पण त्यातही त्यांना यश आले नाही. पण, विकासच्या कुटुंबीयांनी त्यांना नेहमीच साथ दिली.
विकास हा स्टार प्लसवरील ‘मास्टर शेफ’ हा शो देखील होस्ट करतात. या शो दरम्यानच त्यांनी सांगितले की, लहानपणी त्यांची आजी अमृतसरच्या एका छोट्या गल्लीत पराठे बनवायची आणि ते आईसोबत मिळून हे पराठे विकायचे.
विकास जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेले, तेव्हा पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ते निराश झाले. पण शेवटच्या फेरीत त्यांना जेवणाबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सांगितले की, एक दिवस मी वातानुकूलित रेस्टॉरंट उघडणार आहे, जेणेकरून पुन्हा उघड्या छताखाली अन्न शिजवण्याची वेळ येणार नाही. असे सांगून विकास बाहेर पडले, तेवढ्यात मागून कॉलेजचे प्राचार्य आले आणि त्यांनी त्यांच्या स्वप्नाचे कौतुक करत कॉलेजमध्ये प्रवेश दिला.
विकासने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते अमेरिकेत गेले होते, तो काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. त्यांनी अनेक रात्री रस्त्यावर आणि स्टेशनवर झोपून काढल्या, इतकेच नाही तर त्यांना बर्याच वेळा भांडी धुण्यासारखी कामेही करावी लागली.
विकासला न्यूयॉर्कमधील ‘सलाम बॉम्बे’ या रेस्टॉरंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी त्यांना एका शोमध्ये येण्याचे आमंत्रण मिळाले. अशाप्रकारे प्राइम टाईमला टीव्हीवर येणारे ते पहिले भारतीय शेफ होता. या मुलाखतीनंतर त्यांना राजेश भारद्वाज यांचा फोन आला आणि त्यांनी मिळून 2010मध्ये न्यूयॉर्कमध्ये विकासचे स्वप्न असणारे ‘जुनून’ रेस्टॉरंट उघडले आणि आज ते अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे.
2015 मध्ये, विकासने ‘उत्सव’ नावाचे एक पुस्तक लिहिले, जे 1200 पानांचे पुस्तक आहे, ज्यात भारताच्या उत्सवादरम्यान तयार केलेल्या पदार्थांचे वर्णन केले आहे. हे पुस्तक लिहायला विकास यांना तब्बल 12 वर्षे लागली. त्यांनी या पुस्तकाची प्रत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेट दिली होती. याची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिलरी क्लिंटन यांनाही सादर करण्यात आली असून, त्यांनी दोन्ही देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांसाठी त्यांनी जेवण बनवले आहे.
अमेरिकेत सुरुवातीच्या काळात अनेक रात्री रस्त्यावर आणि स्टेशनांवर झोपून काढणाऱ्या विकास खन्ना यांच्या नावावर आज पाच मिशेलिन पुरस्कार आहेत. 2011 मध्ये, विकासला पीपल्स मॅगझिनने अमेरिकेतील सर्वात सेक्सी आणि हॉट शेफ घोषित केले होते.
‘माझी चूक सिद्ध करून दाखवा, पद्मश्री पुरस्कार परत करेन’, ‘त्या’ वादग्रस्त विधानावर कंगना ठाम!