Tu Tevha Tashi: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत कलाकारांची हापूस पार्टी
प्रेक्षकांना या मालिकेतील कलाकार हापूस पार्टी (Hapus Party) करताना पाहायला मिळणार आहेत. इतकंच नव्हे तर अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त करणार आहे.
मालिकेत कलाकारांची हापूस पार्टी
Image Credit source: Facebook
Follow us on
झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी‘ (Tu Tevha Tashi) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेतील हृदयस्पर्शी प्रसंग आणि संवाददेखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मे महिना म्हणजे उन्हाळा आणि या महिन्यात आगमन होतं ते म्हणजे फळांचा राजा आंबा (Mango) याचं. आंबा म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण आणि याच हापूस आंब्यावर तू तेव्हा तशी या मालिकेतील कलाकारांनी ताव मारला आहे. प्रेक्षकांना या मालिकेतील कलाकार हापूस पार्टी (Hapus Party) करताना पाहायला मिळणार आहेत. इतकंच नव्हे तर अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त करणार आहे. सौरभ आता त्याच्या मनातील गोष्ट अनामिकाला सांगणार की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. हापूस प्रमाणेच गोड अशी सौरभ आणि अनामिकेच्या प्रेमाची सुरुवात होणार का, हे प्रेक्षकांना मालिकेत लवकरच पाहायला मिळेल.
20 मार्चपासून रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारतेय.
आंब्यावर कलाकारांनी मारला ताव
हे सुद्धा वाचा
पहा व्हिडीओ-
या मालिकेबद्दल बोलताना स्वप्निल म्हणाला, “जळपास 7-8 वर्षांनंतर मेनस्ट्रीम टेलिव्हिजन करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या मालिकेत माझ्या वयाची भूमिका साकारतोय. मी 44 वर्षांचा आहे आणि या वयोगटातली ही प्रेमकथा आहे. खूप वेगळी आणि आजची गोष्ट आहे जी प्रेक्षकांनी आजवर पाहिली नाही आहे. मी आणि शिल्पा बऱ्याच वर्षांनंतर एकत्र काम करतोय तसेच आम्ही मंदारसोबत देखील पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे ही मालिका त्यातील व्यक्तिरेखा हे सगळंच खूप फ्रेश आहे.”