मुंबई : अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान कॉमेडीयन आहे, हे आता सर्वांना माहित आहे. त्या च्या कॉमेडीचे लाखो चाहते आहेत. कॉमेडियनचा प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) प्रेक्षकांनाही खूप आवडतो. कपिल शर्माचा शो बघितल्यावर प्रत्येकजण पोट धरून हसल्याशिवाय राहत नाही. या शोदरम्यान कपिल अनेकांवर कमेंट करत असतो.
कपिलने केली पंतप्रधान मोदींची नक्कल
‘द कपिल शर्मा शो’ बरोबरच कपिल अजून एक कॉमेडियन शो करत आहे. नेटफ्लिक्सर त्याचा नुकताच नवा शो Kapil Sharma I’m Not Done Yet चे ट्रेलर रिलीज झाले आहे. या ट्रेलरमध्ये कपिल शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य करताना दिसत आहे. कपिल म्हणतो की, अमृतसरमध्ये तीन गोष्टी खूप फेमस आहेत. पहिली म्हणजे बाघा बॉर्डर, दुसरी म्हणजे सुवर्णमंदिर आणि तिसरे म्हणजे या दोघांच्या मध्ये उभे असलेले छोले-कुलचे वाले.
या छोले-कुलचे वाल्यांना नेहमीच एक भिती असते की, रात्री आठ वाजता कोणीतरी येऊन आजपासून येथील छोले-कुलचे बंद करा असे सांगतील. असे म्हणत कपिल यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज काढत त्यांची नक्कल करताना दिसत आहे. आता सोशल मीडियावर कपिल शर्माने पंतप्रधान मोदींची जी नक्कल केली आहे. त्यावर चर्चा होत आहे. हे प्रकरण अजून पुढे काय वळण घेते हे देखील पाहण्यासारखे आहे.
कपिलला अमृतसरची आठवण
कपिल शर्मा वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा देखील मध्यंतरी रंगली होती. कपिल त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी 20 कोटी रुपये घेत असल्याचे देखील सांगितले जात होते. परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला होता. मात्र, कपिल नेमक्या कोणत्या बेव सीरिजमधून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे, हे अद्याप समजू शकले नाही.
संबंधित बातम्या :