मुंबई : कुमकुम भाग्य, साथ निभाना साथिया आणि देश की बेटी नंदिनी या मालिकांमध्ये जबरदस्त भूमिका करणारी टीव्ही अभिनेत्री इरा सोनी (Iira Soni) ही काही दिवसांपूर्वी प्रचंड चर्चेत आली होती. इतकेच नाही तर यादरम्यान तिला सोशल मीडियावर लोकांनी प्रचंड ट्रोल केले. यादरम्यानच्या काळात तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत नाते तोडले. इतकेच नाही तर घरच्यांनीही नाराज होत इरा सोनी हिच्यासोबत नाते तोडले. फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे तिच्या जवळचे सर्व लोक तिच्यापासून दूर गेले. नुकताच इरा सोनी हिने एक मुलाखत दिलीये. यावेळी इरा सोनी हिने सांगितले की, मागच्या वर्षाची मी आता आठवण जरी काढली तरीही मला भीती वाटते. माझ्या फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे माझे सर्व जवळचे लोक माझ्यापासून दूर गेले. तो काळ खरोखरच माझ्यासाठी अत्यंत वाईट आणि फक्त वेदनादायी होता. मी माझ्या आयुष्यात कधीच असे काही होईल, म्हणून विचार केला नव्हता. हे अत्यंत वाईट स्वप्नासारखे सर्व काही झाले.
टीव्ही मालिकांमध्ये जबरदस्त भूमिका केल्यानंतर इरा सोनी हिने ओटीटीवर डेब्यू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिचा हाच निर्णय चुकला आणि आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की, त्याचा विचार तिने कधीच केला नव्हता.
इरा सोनी म्हणाली की, हा अनुभव मला अजूनही त्रास देतो. मला पॉर्नस्टार म्हटले गेले. मला माझे नाव पॉर्न साइट्सवर पॉप अप करणे आणि ते दृश्य तेथे आणणे यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागले.
एक वर्षापूर्वी मी एक खतरनाक आयुष्य जगत होते. मी तो इंटिमेट सीन केल्याने माझे कुटुंबिय दु:खी होते. मला ट्रोल केले जात होते आणि त्यावेळी माझे ब्रेकअपही झाले.
खरोखरच सांगते की, या सर्व गोष्टी मला तोडण्यासारख्या होत्या. मी लाॅन्ग रिलेशनशिपमध्ये होते आणि मी माझे नाते टिकवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले. परंतू ते होऊ शकले नाही. शेवटी माझे ब्रेकअप झाले.
अभिनेत्री पुढे म्हणाली की, वुडपेकर करणे ही फक्त माझी चुक नव्हती तर माझी निवड चुकीची होती. मी बहुतेक स्क्रिप्ट व्यवस्थित वाचली नव्हती. मात्र, यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. आताही मी त्या सर्व गोष्टी आठवल्या की मला त्रास होतो.