मुंबई : बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केलेली प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने गळफास घेत जगाचा निरोप घेतला. अत्यंत कमी वयामध्ये तुनिशा हिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरूवात करत एक खास नाव टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तयार केले होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवरच तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केली. आत्महत्येच्या फक्त सहा तास अगोदर एक पोस्ट तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली होती. सुरूवातीला तुनिशा हिने आत्महत्या केली, यावरती कोणालाच विश्वास बसत नव्हता.
तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्यानंतर दररोज अनेक खुलासे होताना दिसत आहेत. तुनिशाच्या आईने अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमधील तुनिशा हिच्यासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Maharashtra | A heated argument had occurred between Tunisha Sharma and Sheezan before her death. Police have recovered the CCTV footage of the time when the argument happened: Waliv Police on Tunisha Sharma death case
— ANI (@ANI) December 30, 2022
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणात पोलिसांच्या हाती आता एक अत्यंत महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. आत्महत्येच्या काही मिनिटे अगोदरच मालिकेच्या सेटवरच शीजान खान आणि तुनिशा शर्मा यांच्यामध्ये वाद झाला होता.
पोलिसांच्या हाती लागलेल्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, शीजान आणि तुनिशा यांच्यामध्ये काहीतरी बिनसले होते. तुनिशा शर्मा हिच्या आईने यापूर्वीच सांगितले आहे की, शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यामुळे तुनिशा ही तणावामध्ये होती.
शीजान खान याच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलीये. तुनिशा शर्मा हिची आई सतत शीजान खान याच्यावर गंभीर आरोप करत आहे. शीजान खानमुळेच माझ्या मुलीचा जीव गेला आहे…त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे असे तुनिशाच्या आईने म्हटले आहे.