मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी गळफास घेत जगाचा निरोप घेतला. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. तुनिशा हिने अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर मोठे खुलासे होत आहेत. अनेकांनी हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेमधील कलाकार शीजान खान याच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले.
तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर आरोप केले. शीजान खान याला न्यायालयाने 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज परत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयात पोलिसांनी काही मोठे खुलासे तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणात केले आहेत. शीजान खान याच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली असून 30 डिसेंबरपर्यंत शीजान खान याची पोलिस कोठडी वाढवण्यात आलीये.
शीजान खान आणि तुनिशा शर्मा यांचे 15 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. यामुळे तुनिशा ही तणावामध्ये होती. पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितले की, ज्यादिवशी तुनिशा हिने आत्महत्या केली.
त्याचदिवशी आत्महत्येच्या एक तास अगोदर तुनिशा हिच्या आईसोबत तुनिशा आणि शीजानचे फोनवर बऱ्याच वेळ बोलणे झाले होते. यामध्ये नेमके काय संभाषण झाले हे पोलिसांना तपासायचे आहे.
इतकेच नाहीतर पोलिस या केसमध्ये शीजान याची एक्स गर्लफ्रेंड हिची देखील चाैकशी करणार आहेत. तुनिशाच्या आईचे देखील पोलिसांना बयान घ्यायचे आहे. परंतू मुलीच्या आत्महत्येनंतर तुनिशाच्या आईला मानसिक धक्का बसला आहे.