Indian Idol Marathi: कोण पटकावणार विजेतेपद? टॉप 5 स्पर्धकांमध्ये रंगणार सुरांची टक्कर

| Updated on: Apr 12, 2022 | 11:57 AM

सोनी मराठी वाहिनीवरील 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते.

Indian Idol Marathi: कोण पटकावणार विजेतेपद? टॉप 5 स्पर्धकांमध्ये रंगणार सुरांची टक्कर
Indian Idol Marathi finalists
Image Credit source: Tv9
Follow us on

सोनी मराठी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल मराठी’ (Indian Idol Marathi) या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पहिल्यांदाच मराठी भाषेत ‘इंडियन आयडल’ सुरू झालं आणि अजय-अतुल (Ajay-Atul) यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं. (Indian Idol Marathi Finale)

परीक्षक आणि प्रेक्षक मिळून या पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार आहेत. त्यामुळे ‘इंडियन आयडल मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिक, पनवेलचा सागर, वसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, परीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप 5 मध्ये बाजी मारली आहे.

तुम्ही कोणाला देणार मत?

या स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत आहे. प्रत्येकाच्या आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. टॉप 14 मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. या संपूर्ण पर्वात अनेक पाहुण्यांनी विशेष हजेरी लावली आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. लवकरच ‘इंडियन आयडल मराठी’ पर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहे. हा शो सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या प्रेमकहाणीला कधी, कुठे अन् कशी सुरुवात झाली?

Ranbir Alia Wedding: “लवकरच बाबा हो आणि..”; लग्नाच्या चर्चांवर संजय दत्तचा रणबीर कपूरला सल्ला