KBC 13 | …जेव्हा KBCच्या सेटवर अमिताभ बच्चन 30 जुन्या अंगरक्षकाला भेटतात अन् त्याची अधुरी इच्छा पूर्ण करतात!

| Updated on: Oct 07, 2021 | 4:16 PM

'कौन बनेगा करोडपती 13' च्या नव्या एपिसोडमध्ये, अमिताभ बच्चन यांना जेव्हा एका स्पर्धकाचे वडील तीस वर्षापूर्वी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा एक भाग असल्याचे कळले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

KBC 13 | ...जेव्हा KBCच्या सेटवर अमिताभ बच्चन 30 जुन्या अंगरक्षकाला भेटतात अन् त्याची अधुरी इच्छा पूर्ण करतात!
Amitabh Bachchan
Follow us on

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती 13’ च्या नव्या एपिसोडमध्ये, अमिताभ बच्चन यांना जेव्हा एका स्पर्धकाचे वडील तीस वर्षापूर्वी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा एक भाग असल्याचे कळले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावेळी त्यांच्याकडे एक अंगरक्षक (वैयक्तिक अंगरक्षक) असायचा. नुकत्याच एका भागात स्पर्धक रश्मी कदम तिच्या वडिलांना शोमध्ये पाहुणे म्हणून सोबत घेऊन आली होती.

KBC मध्ये अमिताभ बच्चन नेहमी स्पर्धकाच्या व्यवसायाबद्दल कामाबद्दल विचारतात. याच क्रमाने, जेव्हा मानसशास्त्रज्ञ असणाऱ्या रश्मीकडून तिच्या व्यवसायाबद्दल माहिती घेतली. मग, अमिताभ यांनी तिला तिच्या वडिलांबद्दल काही प्रश्न विचारले. यावेळी रश्मीचे वडील म्हणाले, ‘सर, माझे नाव राजेंद्र कदम आहे आणि मी पुणे, महाराष्ट्रातून आहे.’ मग अमिताभ यांनी त्यांना विचारले की, ‘तुम्ही पोलीस आहात का?’

फोटो काढण्याची इच्छा राहिली अपुरी..

अमिताभ बच्चन यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना रश्मीचे वडील राजेंद्र म्हणाले, ‘सर… मी 1992मध्ये तुमचा वैयक्तिक सुरक्षा अधिकारी होतो. म्हणून, मी तुमचा अंगरक्षक म्हणून काम केले आहे.’ राजेंद्र यांचे हे शब्द ऐकून अमिताभ आश्चर्यचकित झाले. राजेंद्र पुढे म्हणाले की, ‘तेव्हा मला नेहमी तुमच्यासोबत फोटो काढायचा होता, त्यावेळी मोबाईल फोन कॅमेरे नव्हते. पण आज मी तुमच्या समोर आहे, यासाठी मी माझ्या मुलीचा खूप आभारी आहे. मी आज खूप आनंदी आहे.’

बिग बींनी केली अधुरी इच्छा पूर्ण

राजेंद्र कदम यांचे शब्द ऐकून अमिताभ बच्चन हसले आणि म्हणाले की, ‘हे जग खूप लहान आहे, तुमच्यासोबत फोटो क्लिक करायला मिळाल्यास मला देखील खूप आनंद होईल.’ खुद्द अमिताभ बच्चन यांचे शब्द ऐकून शोमध्ये उपस्थित सगळ्याच प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

खेळ पुढे नेताना अमिताभ यांनी रश्मीच्या वडिलांना विनंती केली की, ज्या व्यक्तीशी ती लग्न करू इच्छिते तिला परवानगी द्या. यानंतर राजेंद्र यांनी तिला संमती दिली. त्याचवेळी रश्मीने या खेळत साडे बारा लाख रुपये जिंकले.

केबीसीची वाढती लोकप्रियता..

केबीसीच्या प्रत्येक सीझनप्रमाणे हा सीझनही प्रेक्षकांना आवडतो आहे. अमिताभ बच्चन स्वतःच्या शैलीत लोकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. केबीसीचा हा तेरावा सीझन आहे. विशेष म्हणजे हा शो 2000 मध्ये सुरू झाला होता, जो आजही तितक्याच लोकप्रियतेसह सुरु आहे.

रितेश-जिनिलिया लावणार हजेरी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा 13वा (KBC 13) सीझन लोकांना सतत खिळवून ठेवतो आहे. या शोमध्ये दिसणाऱ्या सामान्य स्पर्धकांची कथा प्रेक्षकांना प्रभावित करतात, तर सेलेब्सच्या आगमनामुळे शोमध्ये खूप मजा येते. दर शुक्रवारी या शोचा एक विशेष भाग प्रसारित होतो, जिथे एक विशेष अतिथी शोचा एक भाग बनतो. या क्रमाने, या आठवड्यात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा अमिताभ बच्चन यांच्या शो KBC-13च्या हॉट सीटवर बसून प्रश्नांची उत्तरे देताना दिसले.

हेही वाचा :

Sharad Kelkar Net Worth : कधीकाळी करायचा चोर बाजारातून खरेदी, आता कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे शरद केळकर!

Navratri 2021 Special Song : ‘घनी कूल छोरी’ ते ‘रामो रामो’पर्यंत, नवरात्रीच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून सामील करा ‘ही’ गाणी!