मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली असून कौन बनेगा करोडपतीचे 14 वे (Kaun Banega Crorepati 14) सीझन रविवार, 7 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या शोच्या सुरुवातीच्या भागात देशातील अनेक शूरवीरांना आमंत्रित करण्यात आले आहे. सोनी टीव्हीकडून सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ शेअर करण्यात आलायं. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन म्हणत आहेत की, ‘आझादी के गर्व का महापर्व’ हा सीझन केबीसीमध्ये साजरा होणार आहे.
Ravivaar, 7th August se Raat 9 baje, shuru hoga Kaun Banega Crorepati ka naya adhyay. Hoga azadi ke garv ka mahaparv.#KBC2022@SrBachchan pic.twitter.com/yUuZSUup0k
हे सुद्धा वाचा— sonytv (@SonyTV) July 23, 2022
KBC 14 च्या नव्या प्रोमोमध्ये आमिर खानसह कारगिल युद्धातील मेजर डीपी सिंग, महिला कर्नल मिताली मधुमिता, पद्मविभूषण मेरी कोम, पद्मश्री सुनील छेत्री हे सर्व पहिल्या महाभागात सहभागी होणार आहेत, हे आपण प्रोमोमध्ये पाहू शकतो. या स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावणारे हे सेलिब्रिटी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तर देतीलच, पण त्यांच्या यशस्वी प्रवासातील काही अनुभवही प्रेक्षकांसोबत शेअर करतील.
यावेळी अमिताभ बच्चन सांगत आहेत की, ‘KBC रविवार 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजल्यापासून ‘आझादीचा महापर्व’ साजरा होणार आहे. शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल बोलताना आमिर खान म्हणताना दिसत आहे की, त्याच्यासाठी ही खूप भाग्याची गोष्ट आहे. तर आपल्या अनुभवाबद्दल बोलताना मेजर डीपी सिंह म्हणाले की, अजूनही माझ्या शरीरात 73 छरे आहेत. मेजर डीपी सिंह यांनी कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावली आहे.
स्पेशल एपिसोडनंतर अमिताभ बच्चन सोमवार 8 ऑगस्टपासून खर्या अर्थाने KBC सुरू करणार आहेत. या शोचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. सोमवार ते गुरुवार अमिताभ बच्चन देशातील लोकांसोबत कौन बनेगा करोडपती खेळतील आणि शुक्रवारी शोमध्ये सेलिब्रिटींचे स्वागत केले जाईल. मात्र, या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार आहेत, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, पुन्हा एकदा नव्या सीझनसोबत KBC ने जोरदार सुरूवात केलीयं.