मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) जेव्हा जेव्हा मीडिया फोटोग्राफर्सशी संवाद साधते, तेव्हा ती काहीतरी असे म्हणते जे नेहमी चर्चेत येते. खरं तर, भाजीपाला, जिम, कॉफी पिण्यासाठी किंवा इतर कारणांनी, जेव्हा जेव्हा राखी काही काळ घराबाहेर पडते, तेव्हा ती फोटोग्राफरशी नक्कीच संवाद साधते आणि त्यांच्याकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देते. अलीकडेच राखीने बोलण्याच्या ओघात असे म्हटले की, ‘खतरों के खिलाडी’चे चाहते आनंदी झाले आहेत (Khatron Ke Khiladi 11 Rakhi Sawant disclosed winner name by mistake).
वास्तविक, स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार एका छायाचित्रकाराने राखीला सांगितले की, ‘खतरों के खिलाडी’चे स्पर्धक केपटाऊनमधून भारतात परत आले आहेत. म्हणून ती म्हणाली की, सर्वांचे स्वागत आहे. राहुल वैद्य (Rahul Vaidya), श्वेता तिवारी, स्वागत… अर्जुन बिजलानी जिंकला, नाही का? आता खरं तर राखीने बोलण्याच्या ओघात या हंगामाच्या विजेत्यांची घोषणा केली असेच वाटते आहे. बरं आता अर्जुन खरंच विजेता आहे की नाही, हे येत्या काही काळात कळेल.
पण, नंतर राखी म्हणाली की, ती कधीच केपटाऊनमध्ये गेली नव्हती आणि त्यानंतर तिने फोटोग्राफर्सबरोबर आणखी गप्पा मारल्या.
नुकतेच राखी सावंत हिचे ‘तेरे ड्रीम मी मेरी एंट्री’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे खूपच पसंत केले जात आहे. राखीने तिच्या जबरदस्त डान्स मूव्ह्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे गाणे ज्योतिका टांगरी यांनी गायले आहे आणि परीक्षितने रॅप केले आहे. गौर दास दासगुप्ता याने संगीत दिले असून, विश्वास राणे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.
काही काळापूर्वी राखी सावंत इंडियन आयडॉल 12 या शोमध्ये दिसली होती. राखीने शोच्या सेटवरून व्हिडीओ शेअर केला आणि म्हणाली, ‘आज मी कुठे आहे ते बघा. इंडियन आयडॉलच्या सेटवर. मी खूप उत्सुक आहे. इंडियन आयडॉलच्या सेटवर खूप मजा केली. लवकरच माझा एपिसोड येत आहे. तर तुम्ही सर्व तयार आहात ना? लवकरच तुमच्या भेटीला येतोय धमाका घेऊन…
(Khatron Ke Khiladi 11 Rakhi Sawant disclosed winner name by mistake)
करण मेहरा आणि निशा रावलच्या नात्यातील दरीला 2015 पासूनच सुरुवात, घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं प्रकरण!