मुंबई : टीव्हीचे असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या चॉकलेट लूकमुळे प्रसिद्ध आहेत. या यादीमध्ये छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते हुसैन कुवाजरवाला (Hussain Kuwajarwala) याचाही समावेश आहे. हुसैन कुवाजरवाला यांनी चाहत्यांमध्ये आपले अभिनय कौशल सिद्ध केले होते. एक काळ होता जेव्हा चाहते हुसैनच्या मालिकांची आतुरतेने वाट पाहत असायचे. पण आज हा अभिनेता मनोरंजन विश्वापासून दूर कुठेतरी हरवला आहे.
हुसैन कुवाजरवाला अभिनेता बनण्यापूर्वी एक मॉडेल होता. या नामांकित अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात ‘हम पाच’ या प्रसिद्ध मालिकेने केली होती. या शोमध्ये छोटीशी भूमिका केल्या नंतरच तो ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत दिसला. पण आज हुसैन छोट्या पडद्याच्या झगमगाटी दुनियेतून गायब आहे.
‘क्यूंकी सास भी कभी बहू’ या मालिकेनंतर हुसैन प्रत्येकाचा लाडका बनला होता. यानंतर तो लोकप्रिय मालिका ‘कुमकुम’मध्ये झळकला. जुही परमारसोबतची त्याची जोडी ‘कुमकुम’ मालिकेत झळकली होती. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेत सुमितची भूमिका साकारल्यानंतर तो रातो रात सुपरस्टार बनला होता.
हुसैन जवळपास 7 वर्षे ‘कुमकुम’मध्ये दिसला होता. या मालिकेतील भूमिकेमुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळाली होती. या शो नंतर, अभिनेता ‘किसमी कितना है दम’, ‘कुछ कर दिखाना है’, ‘खुल जा सिम सिम’, ‘नच बलिये 2’ आणि ‘शाबाश इंडिया’ या कार्यक्रमामध्ये दिसला होता. याशिवाय, त्यांनी लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ देखील त्याने होस्ट केला होता आणि यातही जुही परमार सोबत त्याच्या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले.
टीव्हीवर यश मिळाल्यानंतर हुसैनने 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हुसैन ‘श्री’ या चित्रपटात दिसला होता. हुसैनला या चित्रपटातून फारसे यश मिळाले नाही. मात्र, त्यानंतर अभिनेता पुन्हा चित्रपटांमध्ये दिसला नाही.
हुसैनने आपल्या कारकिर्दीत साकारलेल्या भूमिकांमध्ये एक वेगळी शैली होती. यामुळे, त्याला चांगली फॅन फॉलोइंगही मिळाली होती. हुसैनने आजकाल अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. याबद्दल सांगायचे तर, 2010 पासून, त्याने खूप कमी प्रोजेक्ट केले आहेत. 2020 मध्ये, तो आलियासोबत एका विशेष भूमिकेत दिसला. आता हुसैन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
Raj Kundra : 2 महिने तुरुंगात काढल्यानंतर राज कुंद्रा कसे दिसतात?, फोटोंमध्ये पाहा बदललेला लुक
Khatron Ke Khiladi 11 : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानीने जिंकली KKK11ची ट्रॉफी