मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) गेल्या 39 दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत आहेत. राजू यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत असून त्यांची तब्येत (Health) हळूहळू बरी होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एक महिना उलटूनही राजू यांना शुद्ध आली नसल्याने डाॅक्टरांनी चिंता व्यक्त केलीये. एम्स रूग्णालयातील तज्ज्ञ डाॅक्टरांची (Doctor) टीम राजू यांना बरे करण्याची मेहनत घेते आहे. राजू श्रीवास्तव यांचे चाहते त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहे. राजू यांच्या कुटुंबाकडून ते लवकरच बरे होतील, असे सांगण्यात येतय.
राजू श्रीवास्तव यांची तब्येत स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र, 10 आॅगस्टपासून राजू यांना एकदाही शुद्ध आली नाहीये. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, राजू यांना शुद्ध आली असून त्यांनी आपल्या पत्नीसोबत संवादही साधलाय. मात्र, त्यानंतर राजू यांच्या कुटुंबाकडून ही अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राजू यांच्या तब्येतीबाबत त्यांचे कुटुंबीय आणि डाॅक्टर चाहत्यांसाठी अपडेट देत आहेत.
राजूच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नसल्यामुळे त्यांना शुद्ध येत नसल्याची माहिती डाॅक्टरांनी सांगितली आहे. राजू यांचे भाऊ दीपू यांनी सांगितले आहे की, डॉक्टरांनी राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्याचा विचार केला होता. मात्र, राजू यांना अधून मधून ताप येतोय. यामुळे डाॅक्टरांनी अध्यापही राजू यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.