मुंबई : बिग बाॅस १६ च्या फिनालेला अवघे काही तास उरले आहेत. बिग बाॅसच्या (Bigg Boss 16) घरात आता फक्त पाच स्पर्धेक उरले असून यापैकी एकजण बिग बाॅसचा विजेता होणार आहे. बिग बाॅस १६ मध्ये घरातील स्पर्धेकांनी प्रेक्षकांचे आतापर्यंत जबरदस्त असे मनोरंजन केले आहे. इतकेच नाही तर फिनाले विकमध्येही घरामध्ये मोठे वाद बघायला मिळाले. बिग बाॅसने घरातील सदस्यांना शेवटचा टास्क हा टाॅर्चर टास्क दिला होता. या टास्कमध्येही घरातील सदस्यांनी मोठा हंगामा केला. यापूर्वीच्याही अनेक सीजनमध्ये टाॅर्चर टास्क (Torture task) बिग बाॅसकडून देण्यात आलाय. मात्र, कधीही यापूर्वी बिग बाॅसच्या घरात जो प्रकार घडला नाही तो या सीजनमध्ये घडला आहे. टाॅर्चर टास्कमध्ये अर्चना गाैतम हिने शिव ठाकरे, निम्रत काैर आणि एमसी स्टॅन यांच्या डोळ्यामध्ये चक्क हळद, मीठ आणि निरमा टाकला. यामुळे शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्या डोळ्याला मोठा इजा झाली. तसेच निम्रत काैरच्या डोळ्याला देखील जखम झाली. अर्चना गाैतम हिचे हे रूप बघताच बिग बाॅसच्या निर्मात्यांनी हा टास्कमध्येच थांबवण्याचा निर्णय घेतला.
बिग बाॅस १६ चा ग्रँड फिनाले जबरदस्त करण्यासाठी बिग बाॅसच्या निर्मात्यांकडून खास रणनिती आखण्यात आलीये. सीजन धमाकेदार झाले म्हटल्यावर ग्रँड फिनाले देखील धमाकेदार होणार आहे.
ग्रँड फिनालेमध्ये घरातील सदस्य जबरदस्त डान्स करताना दिसणार आहेत. सध्या बिग बाॅसच्या घरामध्ये एमसी स्टॅन, शिव ठाकरे, अर्चना गाैतम आणि प्रियंका चाैधरी हे स्पर्धेक आहेत. यांच्यापैकी एकजण बिग बाॅस १६ चा विजेता होणार आहे.
बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले हा 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार असल्याचे रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे. कलर्स टिव्हीवर तुम्ही या फिनाले पाहू शकता. विशेष बाब म्हणजे हे पहिल्यांदाच घडले असून पाच तास बिग बाॅसच्या फिनाले हा चालणार आहे.
इतकेच नाही तर या फिनालेमध्ये बिग बाॅसच्या घरातून बेघर झालेली सुंबुल ताैकीर ही देखील डान्स करणार आहे. साधारण रात्री बारा वाजता बिग बाॅसच्या विजेत्याचे नाव घोषित केले जाईल.
बिग बाॅस १६ चा विजेता कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांची सोशल मीडियावर हवा दिसत आहे. शिव ठाकरे याचे समर्थन करताना अनेक मराठी कलाकार दिसत आहेत.