मुंबई : बिग बॉस 16 चा फिनाले पार पडून बरेच दिवस झाले आहेत. मात्र, तरीही सोशल मीडियावर बिग बॉस 16 (Bigg Boss 16) ची चर्चा आहे. विशेष म्हणजे फिनाले होऊन इतके जास्त दिवस उलटले असताना देखील बिग बॉस 16 मधील सदस्य घराबाहेर धमाल करत पार्ट्या करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच बघायला मिळत असेल की, जवळपास सर्वच सदस्य हे बिग बॉस संपल्यानंतर एकत्र येत बाहेर धमाल करत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये सतत भांडणे करणारे सर्वजण आता पार्ट्यांमध्ये एकत्र येत डान्स करताना दिसत आहेत. बिग बॉस 16 च्या सदस्यांसाठी सर्वात अगोदर सलमान खान याने पार्टीचे आयोजन केले होते.
सलमान खान याच्यानंतर फराह खान हिने, त्यानंतर शेखर सुमन याने आणि अब्दू रोजिक याने. या पार्ट्यांमध्ये जवळपास सर्व बिग बॉस 16 मधील सदस्य धमाल करताना दिसले. हे सीजन खास ठरले. या सीजनमध्ये खरी मैत्री अब्दू रोजिक, शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टॅन, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्यामध्ये बघायला मिळाली.
सर्वांना वाटत होते की, शिव ठाकरे किंवा प्रियंका चाैधरी यांच्यापैकी एकजण हा बिग बॉस 16 चा विजेता होईल. मात्र, सर्वांना मोठा धक्का देत एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 चा विजेता झाला. एमसी स्टॅन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. बिग बॉस 16 मध्ये काही खास गेम खेळताना एमसी स्टॅन हा दिसला नाही. मात्र, चांगली फॅन फाॅलोइंग असल्याने तो बिग बॉस 16 चा विजेता झाला.
MC Stan created history at age of 23@MCStanOfficial evolves as one of the Most Popular musician according to Google Trends by surpassing India’s ?Most loved and most listened singers Arijit Singh, Neha Kakkar, AR Rahman Jubin Nautiyal, etc.
10M HEARTS FOR MC STAN pic.twitter.com/9kovthN5YD
— ?? ???? ???????? ??⛓️ (@ItsTeamMCStan) March 3, 2023
बिग बॉस 16 चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन याच्या फॅनमध्ये मोठी वाढ होताना सतत बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता विराट कोहली यालाही एमसी स्टॅन याने मागे टाकले आहे. इतकेच नाहीतर एमसी स्टॅन याने नुकताच अनेक दिग्गज गायकांनाही मागे टाकत एक खास रेकाॅर्ड तयार केलाय.
एका फॅन पेजनुसार एमसी स्टॅनने संगीत क्षेत्रातील सर्व दिग्गज गायकांना मागे टाकले आहे आणि तो सर्वाधिक गाणे ऐकलेला गायक ठरला आहे. विशेष म्हणजे एमसी स्टॅन याने अरिजीत सिंह, नेहा कक्कड, ए. आर. रहमान यांनाही मागे टाकले आहे. गूगल ट्रेंड्सनुसार एमसी स्टॅन हा लोकप्रिय गायक आहे. विशेष म्हणजे तो ट्विटर पर ट्रेंड देखील होतोय.