Tunisha Sharma Suicide Case | तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात एसटी हसन यांनी केले लव्ह जिहादवर मोठे विधान

| Updated on: Dec 31, 2022 | 5:34 PM

आज न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले आहे.

Tunisha Sharma Suicide Case | तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात एसटी हसन यांनी केले लव्ह जिहादवर मोठे विधान
Follow us on

मुंबई : तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर आरोप केले आहेत. शीजान खान हा सध्या कोठडीमध्ये आहे. 24 डिसेंबरपासून शीजान खान हा पोलिस कोठडीमध्ये होता. आज न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले आहे. यामुळे तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात शीजान खान याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये.

तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्यानंतर मोठे खुलासे होत आहेत. इतकेच नाही तर हा सर्व प्रकार लव्ह जिहादचा असल्याचे देखील अनेकांचे म्हणणे आहे. तुनिशाच्या मामानेच लव्ह जिहादचा आरोप केला होता.

आता या वादामध्ये सपा खासदार एसटी हसन यांनी मोठे विधान केले आहे. एसटी हसन म्हणाले, शीजान खान आणि तुनिशा शर्मा यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांना लग्न देखील करायचे होते.

आपल्या समाजामध्ये दोन विविध धर्मांच्या लोकांनी लग्न करणे हे चांगले मानले जात नाही. बहुतेक यांच्यावर समाजाचा दबाव होता. परंतू हे काहीही असो तुनिशाने इतके मोठे पाऊल उचलायला नको होते.

पुढे एसटी हसन म्हणाले, सर्वच गोष्टी या लव्ह जिहादच्या अॅंगलने बघणे मुळात चुकीचे आहे. मला पहिल्याच दिवशी वाटले होते की, या प्रकरणातील सर्व गोष्टी शेवटी लव्ह जिहादवर येतील.