मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका साकारणार आहेत. आज शिवाजी महाराजांची जयंती (Shivjayanti) आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अश्यातच आज स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेचा शिवजयंती विशेष भाग दाखवला जाणार आहे. यात अमोल कोल्हे पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारताना पहायला मिळणार आहेत. याआधीही अमोल कोल्हेंनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाहवरच्या राजा शिवछत्रपती या मालिकेत त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. स्वराज्यजननी जिजामाता या सोनी मराठीवरच्या मालिकेतही ते शिवरायांच्या भूमिकेत दिसले होते. तसंच स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठीवरच्या मालिकेतून त्यांनी संभाजी महारांजांचं कार्य घराघरात पोहोचवलं. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
अमोल कोल्हे पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारणार
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अश्यातच आज स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेचा शिवजयंती विशेष भाग दाखवला जाणार आहे. यात अमोल कोल्हे पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारताना पहायला मिळणार आहेत.
अमोक कोल्हे यांची कारकीर्द
स्टार प्रवाहवरच्या राजा शिवछत्रपती या मालिकेत त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. स्वराज्यजननी जिजामाता या सोनी मराठीवरच्या मालिकेतही ते शिवरायांच्या भूमिकेत दिसले होते.वीर शिवाजी या हिंदी मालिकेतही त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. तसंच स्वराज्यरक्षक संभाजी या झी मराठीवरच्या मालिकेतून त्यांनी संभाजी महाराजांचं कार्य घराघरात पोहोचवलं. सोबतच अमोल कोल्हे यांनी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. साहेब, रंगकर्मी, राजमाता जिजाऊ, अरे आवाज कुणाचा या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. या गोजिरवाण्या घरात, ओळख यासारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलंय.
अमोल कोल्हे अभिनयासोबत राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. ते सध्या राष्ट्रावादीकडून शिरूर मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. याआधी ते शिवसेनेत होते.
संबंधित बातम्या