मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे गेल्या 24 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. 24 दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीबाबत वेगवेगळे अपडेट पुढे येत असून परवा त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. डॉक्टरांची (Doctor) टीम सतत त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहे. राजू यांचे चाहते देवाकडे राजूंच्या तब्येतीसाठी प्रार्थना करताना दिसतायंत. नुकतेच आलेल्या रिपोर्टनुसार, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना संसर्गाचा (Infection) धोका वाढला असल्याचे सांगितले जातंय. डॉक्टरांनी त्यांच्या उपचारात अधिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एक दिलासादायक बातमी म्हणजे राजू यांचे हार्ट पहिल्यासारखेच काम करते आहे.
डॉ. चिन्मय गुप्ता यांनी सांगितले की, राजू यांच्या हार्ट पहिल्यासारखेच नॉर्मल काम करते आहे. यामुळे राजू यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा दिलासा मिळालायं. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांच्या मेंदूचे नुकसान झाले होते आणि मेंदूने योग्य प्रतिसाद देणे बंद केले होते. आता त्याच्या मेंदूमध्येही सुधारणा झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र अजून त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी 10 ते 12 दिवस लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
गेल्या 24 दिवसांपासून राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. मध्यंतरी काही बातम्या आल्या होत्या की, राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. मात्र, अजूनही राजू हे व्हेंटिलेटरवर आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे देखील सांगितले जात आहे. एम्सचे डॉक्टर चिन्मय गुप्ता यांनीही सांगितले की, राजू श्रीवास्तव हे अगोदरपासूनच हृदयाचे रुग्ण आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या तब्येतीत बरेच चढ-उतार आले. त्यानंतर आता त्यांनी उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.