मुंबई : बिग बाॅसच्या घरामध्ये सत्ता परिवर्तन झाले असून आता अंकित गुप्ता हा घराचा नवा राजा आहे. आतापर्यंत बिग बाॅसच्या घरात कोणत्याच टास्कमध्ये अंकितचा सहभागा जास्त नव्हता. इतकेच नाही तर जेंव्हा बघावे तेंव्हा अंकित फक्त घरामध्ये झोपा काढताना दिसतो. यावर सलमान खान आणि बिग बाॅसने देखील अंकितला अनेकदा गोष्टी सुनावल्या आहेत. मात्र, कालच्या टास्कमध्ये अंकित राजा झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
अर्थातच आता अंकित बिग बाॅसच्या घराचा राजा असल्याने त्याच्या हातामध्ये काही गोष्टी आल्या आहेत. अंकित राजा झाल्यानंतर ही घरामध्ये प्रियंका आणि अंकितमध्ये जोरदार वाद झाले.
बिग बाॅस घरातील सदस्यांना या आठवड्याच्या नाॅमिनेशनसाठी टास्क देतात. अंकितला विशेष अधिकार देत त्याच्या जवळच्या सहा सदस्यांना इतर सदस्यांना नाॅमिनेशन करण्याचा अधिकार मिळतो.
Kaunse contestants honge iss hafte ghar se beghar hone ke liye nominate? ?
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot#BB16 #BiggBoss@beingsalmankhan @TRESemmeIndia @Chingssecret @MyGlamm pic.twitter.com/TUkuYANA9Y
— Bigg Boss (@BiggBoss) December 6, 2022
यावेळी अर्चना टीनाला नाॅमिनेट करते आणि कारण देते की, टीना घरामध्ये राहण्यासाठी फेक प्रेम वगैरे करत आहे. तिचे खेळामध्ये काहीच लक्ष नाहीये. हे ऐकल्यावर टीनाचा पारा चढताना दिसतो.
सुंबुल ताैकीर देखील यावेळी शालिनला नाॅमिनेट करते. यावेळी शालिन तिला म्हणतो की, घरात आल्यावर मी हिचा चांगला मित्र होतो. परंतू आता मला नाॅमिनेट करत आहे. हे ऐकून सुंबुल देखील त्याला जोरदार प्रतिउत्तर देते.
या आठवड्यामध्ये नाॅमिनेशनमध्ये सुंबुल, टीना, निम्रत, एमसी असून यापैकी एक सदस्य घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅस घरातील सदस्यांना बेघर करत नाहीयेत.