मुंबई : उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीपासून चर्चेत आलीये. बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत राहते. उर्फी जावेद ही कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. नुकताच उर्फी जावेद हिने चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर तिने इंस्टा स्टोरीवर आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांच्याविरोधात एक पोस्टही शेअर केली आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आदित्य चोप्रा यांनी पहिल्यांदाच नेपोटिझमवर खुलेपणाने भाष्य केले. मात्र, आदित्य चोप्रा यांचे म्हणणे उर्फी जावेद हिला अजिबात पटले नसल्याचे दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने आदित्य चोप्रा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता उर्फी जावेद हिची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिने जो मुद्दा या पोस्टमध्ये मांडला आहे, तो पण अनेकांनी पटलाय.
गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधील नेपोटिझमचा (घराणेशाही) मुद्दा सातत्याने गाजताना दिसतोय. नेपोटिझमचा मोठा फटका बाॅलिवूडला बसत असल्याचे यापूर्वी अनेकांनी म्हटले आहे. एका मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा याने यावर भाष्य केले.
आदित्य चोप्रा म्हणाले होते की, नेपोटिझममुळे मी माझ्या भावाला स्टार बनू शकलो नाही. तो एका मोठ्या चित्रपट निर्मात्यांचा मुलगा असूनही बाॅलिवूडमध्ये ठसा उमटवू शकला नाही. म्हणजे तो एक अभिनेता आहे, मात्र, तो बाॅलिवूडचा स्टार होऊ शकला नाही.
YRF सारखी कंपनी असूनही माझा भाऊ उदय हा फेमस अभिनेता होऊ शकला नाही, म्हणजे मी माझ्या घरातील व्यक्तीला स्टार बनवू शकलो नाही. फक्त एक दर्शक ठरवेल की मला ही व्यक्ती आवडते, मला या व्यक्तीला पहायचे आहे, इतर दुसरे कोणीही ठरवू शकत नाही…
आता उर्फी जावेद हिने आदित्य चोप्रा यांच्या याच विधानाचा समाचार घेतला आहे. उर्फी जावेद म्हणाली की, नेपोटिझम हे यशाबद्दल नाही तर संधींबद्दल आहे. उदय चोप्रा दिसायला चांगला किंवा चांगला अभिनेता नव्हता. त्याचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले. तरीही त्याला सतत काम मिळत राहिले.
पुढे उर्फी जावेद हिने लिहिले की, उदयच्या नावासमोर चोप्रा ऐवजी चौहान असते आणि त्याचा चित्रपट फ्लाॅप गेला असता तर त्याला परत कधीच कोणत्याही चित्रपटात संधी मिळाली नसती. अशाप्रकारे पुढेही तुम्ही लोक नेपोटिझमचा सहारा घेणार आहेत?