मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’चे (KBC 13) निर्माते सिद्धार्थ बसू यांनी ‘KBC 13’च्या अलीकडील भागात विचारलेल्या प्रश्न आणि उत्तराचा गैरसमज करणाऱ्या दर्शकाला उत्तर दिले आहे. हा दर्शक म्हणतो की, लोकसभा आणि राज्यसभेशी संबंधित प्रश्न सोमवारी शोमध्ये विचारला गेला आणि त्याला दिलेले योग्य उत्तर, दोन्ही चुकीचे आहेत. या वापरकर्त्याच्या ट्विटला उत्तर देताना सिद्धार्थ म्हणाले की, यात काहीही चुकीचे नाही.
सोमवारी अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धक दिप्ती तुपे यांना विचारले की, ‘सामान्यतः भारतीय संसदेची प्रत्येक बैठक कोणत्या पर्यायाने सुरु होते? या प्रश्नासाठी चार पर्याय होते, 1. झिरो अवर, 2. क्वेश्चन अवर, 3. लेजिस्लेटिव बिजनेस, 4. प्रिविलेज मोशन. अचूक उत्तर होते- क्वेश्चन अवर.
आशिष चतुर्वेदी नावाच्या वापरकर्त्याने या प्रश्नाचा स्क्रीनशॉट आणि त्याचे उत्तर त्याच्या ट्विटरवर शेअर केले आहे. तसेच लिहिले की, आजच्या केबीसी एपिसोडमध्ये चुकीचे प्रश्न आणि उत्तर दाखवले गेले. टीव्हीवर सभागृहाच्या अनेक सत्रांचे अनुसरण केले. सहसा लोकसभेची बैठक शून्य तास आणि राज्यसभेची सुरुवात प्रश्नोत्तरापासून होते. कृपया हे तपासून घ्या. आशिषने या ट्विटमध्ये शोचे निर्माते सिद्धार्थ आणि अमिताभ बच्चन यांनाही टॅग केले.
Wrong question and answer in today’s episode of @KBCsony Have followed several sessions on TV. Normally sitting in #LokSabha begins with Zero hour and sitting in #RajyaSabha begins with Question hour. Please get it checked. @SrBachchan @LokSabhaSectt @babubasu pic.twitter.com/KYu1EJkZid
— Ashish Chaturvedi ?? (@ashishbnc) September 13, 2021
केबीसीच्या या दर्शकाला उत्तर देताना सिद्धार्थने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘यात कोणतीही चूक नाही. कृपया तुमच्या माहितीसाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांची हँडबुक तपासा. दोन्ही सभागृहांमध्ये, अध्यक्ष/सभापतींनी निर्देशित केल्याशिवाय, बैठका पारंपारिकपणे प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू होतात. त्यानंतर शून्य तास आहे.’
मात्र, हा प्रेक्षक इथेच थांबला नाही. सिद्धार्थच्या उत्तरानंतरही त्याने प्रश्न उपस्थित केला. दोन स्क्रीन शॉट्स शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘मिस्टर बसू, उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. मी लोकसभा आणि राज्यसभेची वेबसाइट क्रॉस चेक केली आहे. दोन स्क्रीनशॉट साक्ष देतात की, प्रश्न आणि उत्तर दोन्ही चुकीचे होते. मी तुम्हाला सांगतो की राज्यसभेची बैठक सकाळी 11 वाजता सुरू होते.’
No error whatsoever. Kindly check the handbooks for members of the Lok Sabha & Rajya Sabha for yourself. In both houses, unless otherwise directed by the speaker/chairperson, sittings conventionally begin with Question Hour, followed by Zero Hour
— Siddhartha Basu (@babubasu) September 14, 2021
‘केबीसी 13’च्या या प्रश्नावर एका दर्शकाने उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे निर्माते देखील अस्वस्थ झाले असतील. आता हे पाहावे लागेल की, शोचे निर्माते सिद्धार्थ या वापरकर्त्याच्या दुसऱ्या ट्विटला काय प्रतिसाद देतात.