मुंबई : सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राजीव सेन याचा चारू असोपा हिच्या सोबत घटस्फोट होणार आहे. राजीव आणि चारू हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. राजीव आणि चारू यांची एक मुलगी आहे, जिचे नाव जियाना असे आहे. काही दिवसांपूर्वी चारू असोपा हिने राजीव याच्यावर गंभीर आरोप करत म्हटले होते की, मी गर्भवती असताना राजीव मला धोका देत होता आणि त्याचे अफेअर सुरू होते. इतकेच नाही तर तो मला सतत खोटे देखील बोलत होता.
राजीव याने तर चारू असोपाचे करण मेहरासोबत अफेअर सुरू असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना चारू म्हणाली होती की, मी आणि करण फक्त मित्र आहोत. कोणासोबत तरी नाव जोडायचे म्हणून हा करणसोबत माझे नाव जोडत आहे.
आता राजीव सेन याने चारूवर गंभीर आरोप केले आहेत. राजीव याने म्हटले आहे की, चारू मला माझ्या मुलीला भेटू देत नाहीये. तिने इगो बाजूला करून मला माझ्या मुलीसोबत वेळ घालू द्यायला हवा.
पुढे राजीव म्हणाला की, माझ्या मुलीचा जियानाचा वापर करून ती यूट्यूब वर व्यूज वाढवत आहे. हे करण्याऐवजी तिने मुलीच्या संगोपनावर लक्ष देण्याची गरज आहे. तिने मुलीला जास्त वेळ द्यायला हवा.
माझ्या मुलीसाठी मी कायमच असणार आहे. जियानाच्या नावाचा चारूने वापर करणे थांबवावे. राजीव आणि चारू यांच्यामधील वाद थांबण्याचे नाव घेत नाही. दोघेही एकमेकांवर सातत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करत आरोप करत आहेत.
चारू असोपा ही आता तिच्या मुलीसोबत मुंबईमध्ये राहते आहे आणि ती नव्या घरात शिफ्ट झालीये. काही दिवसांपूर्वी चारू हिने तिच्या संपूर्ण घराची झलक तिच्या चाहत्यांना दाखवली होती.