मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे गेल्या एक महिन्यांपासून दिल्लीतील रूग्णालयात उपचार घेत आहेत. 10 आॅगस्ट रोजी राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीतील एम्स रूग्णालयात राजू यांच्यावर उपचार (Treatment) सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांचे चाहते आणि कुटुंबीय सध्या चिंतेत असून 35 दिवस होऊनही राजू यांना एकदाही शुद्ध आली नाहीयं. राजू यांच्यावर रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. राजू यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आल्यापासून शुद्ध आलेली नाहीयं.
राजू श्रीवास्तव यांच्यावर एक महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. मात्र, राजू यांना शुद्ध नेमकी कधी येणार, यावर डॉक्टरांकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने चाहत्यांचे टेन्शन वाढल्याचे चित्र बघायला मिळते आहे. राजू यांच्या चांगल्या तब्येतीसाठी कुटुंबीय आणि चाहत्यांकडे प्रार्थना केल्या जात आहेत. कानपूरच्या प्रसिद्ध पंकी मंदिरात राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी पूजा देखील करण्यात आलीयं.
सुरूवातीला राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा बाहेर सुरू होत्या. मात्र, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. इतकेच नाही तर कुटुंबातील सदस्यांपैकी राजू यांचे हेल्थ अपडेट सांगितले जाणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले, मात्र, ते फक्त अफवा असल्याचेनंतर स्पष्ट झाले.