Rakhi Sawant | राखी सावंत हिच्या निशाण्यावर आदिल दुर्रानी, थेट इशारा देत म्हणाली…

| Updated on: Feb 28, 2023 | 5:49 PM

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामधील वाद थेट कोर्टात पोहचला आहे. राखी सावंत ही सतत आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. नुकताच राखीने आदिलला मोठा इशारा दिला आहे.

Rakhi Sawant | राखी सावंत हिच्या निशाण्यावर आदिल दुर्रानी, थेट इशारा देत म्हणाली...
Follow us on

मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड आहेत. राखी सावंत (Rakhi Sawant) ही बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यावर तिने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांना मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करण्याच्या तब्बल 7 महिने अगोदरच तिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, आदिल दुर्रानी (Adil Durrani) याने थेट राखी सावंत हिच्यासोबत लग्न स्वीकारू शकत नाही असे म्हटले होते. आदिल दुर्रानी म्हणाला होता की, मी खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये राखी सावंत हिच्यासोबत लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनी आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न स्वीकारले.

राखी सावंत हिच्या आईच्या निधनाला काही दिवस उलटले असतानाच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर राखी सावंत हिने थेट पोलिस ठाणे गाठत आदिल दुर्रानी याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अगोदर चाैकशी करून आदिल दुर्रानी याला अटक केली.

आदिल दुर्रानी हा कोठडीमध्ये असतानाच राखी सावंत सतत धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे. नुकताच राखी सावंत ही सोशल मीडियावर लाईव्ह आली होती. यावेळी राखी सावंत हिने थेट आदिल दुर्रानी याला मूर्ख म्हटले आहे. तसेच राखी म्हणाली की, काहीही झाले तरीही मी आदिल दुर्रानी याला तलाक देणार नाहीये.

पुढे राखी म्हणाली की, काहीही झाले तरी आदिल मी तुला तलाक देणार नाही. आपला फक्त निकाह झाला नसून आपले लग्न कोर्टात देखील झाले आहे. तु दुसऱ्या मुलींसोबत लग्न केले की, मी तुझ्यावर केस करणार आहे. काहीही झाले तरीही मी तुला सोडणार नाहीये. राखी म्हणाली आदिल दुर्रानी तु खूप जास्त चुकीचे करत आहेस.

आदिल तु महिलांना बेवकूफ बनवणे बंद कर…आदिल दुर्रानी याच्यासोबत वाद सुरू असतानाच राखी सावंत ही थेट दुबईला पोहचली आहे. तिथे राखीने अभिनय अकादमी सुरू केली आहे. आदिल दुर्रानी हा सध्या कोठडीमध्ये असून पोलिस त्याची चाैकशी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आदिल दुर्रानी याच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे.