मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने मराठी बिग बाॅसमधून बाहेर पडत मोठा धक्का सर्वांना दिला. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न सात महिन्यांपूर्वीच केले होते. राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी राखी सावंत म्हणाली होती की, मी बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यावर मला अनेक गोष्टींमध्ये बदल झालेले दिसले. मला आदिल दुर्रानी (Adil Durrani) याने लग्नाची गोष्ट एक वर्ष सर्वांपासून लपवून ठेवण्यास सांगितले होते. मात्र, आदिल दुर्रानी हा मला धोका देत असल्याने इच्छा नसताना देखील मला लग्नाची गोष्ट जाहिर करावी लागली. राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी अगोदर कोर्टाते लग्न केले आणि मग निकाह केला. विशेष म्हणजे राखी सावंत हिने लग्नानंतर इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. लग्नाला काही दिवस झालेले असतानाच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर काही गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर राखी आणि आदिल दुर्रानी यांचे प्रकरण आता थेट कोर्टात (Court) पोहचले आहे.
राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर घरेलू हिंसाचारचा आरोप करत तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी चाैकशीला बोलावून आदिल दुर्रानी याला अटक केली. या दरम्यान सतत राखी सावंत ही आदिल दुर्रानी याच्यावर आरोप करत आहे.
आदिल दुर्रानी या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. राखी सावंत म्हणाली होती की, आदिल दुर्रानी याने माझे काही खासगी व्हिडीओ विकले आहेत. इतकेच नाही तर त्याने माझे काही दागिने आणि तब्बल दीड कोटी रूपये घेतले आहेत.
या सर्व वादामध्ये एक नाव सतत पुढे येतंय, ते म्हणजे आदिल दुर्रानी याची गर्लफ्रेंड तनु चंदेल हिचे. आता राखी सावंत हिने गर्लफ्रेंड तनु चंदेल हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
राखी सावंत म्हणाली की, गर्लफ्रेंड तनु चंदेल ही आदिल दुर्रानी याच्या बाळाची आई होणार आहे. याचा एक व्हिडीओ राखी सावंत हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
राखी सावंत म्हणाली की, आदिल दुर्रानी तू माझ्यासोबत बाळाचा प्लॅन केला होतास, मी तुझी बायको आहे आणि तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत बाळाचा प्लॅन केलाय? आता खरोखरच राखी सावंत हिने केलेला दावा खरा आहे का? यावर चर्चा रंगत आहे.