मुंबई : राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून चर्चेतील एक नाव आहे. मराठी बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सर्वांना मोठा धक्का देत थेट आदिल दुर्रानी यांच्यासोबत सात महिन्यांपूर्वी लग्न केले आणि इस्लाम धर्म स्वीकारल्याचे म्हटले. इतकेच नाही तर राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओही शेअर केले. या दरम्यान आदिल दुर्रानी (Adil Durrani) याने राखी सावंत हिच्यासोबत झालेले लग्न नाकारू शकत नाही आणि स्वीकारू शकत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांनी आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिला आपली पत्नी म्हणून स्वीकारल्याचे सांगितले. याच काळात राखी सावंत हिच्या आईचे निधन झाले. यावेळी राखी सावंत हिच्यासोबत आदिल दुर्रानी दिसत होता. मात्र, आईच्या निधनाला काही दिवस उलटले आणि राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप केले. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी यांच्याविरोधात आयपीसी कलम 498A, 377, 406, 323,504, 506 अंतर्गत एफआयआर दाखल केली.
राखी सावंत हिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अगोदर आदिल दुर्रानी याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले आणि मग अटक केली. आता सध्या आदिल दुर्रानी हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. राखी सावंत हिने केलेल्या आरोपांनंतर आदिल दुर्रानी याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये.
राखी सावंत हिने म्हटले होते की, आदिल दुर्रानी याने माझे दीड कोटी रूपये घेतले आहेत. माझ्यासोबत लग्न करण्याच्या अगोदरच त्याचे लग्न देखील झाले होते. जे मला अगोदर माहिती नव्हते. आता त्याचे तनु नावाच्या मुलीसोबत अफेअर सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने मोठा खुलासा करत म्हटले होते की, गर्लफ्रेंड तनु चंदेल ही आदिल दुर्रानी याच्या बाळाची आई होणार आहे. आदिल दुर्रानी तू माझ्यासोबत बाळाचा प्लॅन केला होतास, मी तुझी बायको आहे आणि तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत बाळाचा प्लॅन केलाय? राखी सावंत हिने एका व्हिडीओच्या माध्यमातून तनु प्रेग्नेंट असल्याचा दावा केला.
नुकताच राखी सावंत हिच्यावर आदिल दुर्रानी याने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. यावर राखी सावंत हिने कोर्टात सांगितले की, मी ज्यावेळी आदिल दुर्रानी याच्या कुटुंबियांना फोन करते, त्यावेळी ते लोक माझा फोन उचलत नाहीत.
आदिल दुर्रानी हा देखील आता तुरुंगात आहे, मग मी त्याला धमकी कशी देऊ शकते? मग मी काय आदिल दुर्रानी याच्या वकिलाला धमकी दिली का? यावर राखी सावंत हिच्या वकिलाने म्हटले की, केस हारताना दिसत असल्याने असे आरोप आदिल दुर्रानी याच्याकडून केले जात आहेत.