मुंबई : राखी सावंत ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. दररोज राखी सावंत (Rakhi Sawant) वेगवेगळे खुलासे करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने खुलासा केला होता की, आदिल दुर्रानी याने मला धोका दिला असून माझ्यासोबत लग्न करण्याच्या अगोदरच त्याचे लग्न झाले आहे. यावेळी राखी सावंत हिने पैपराजी यांना आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्या पहिल्या लग्नाची पत्रिकाही दाखवली होती. राखी सावंत म्हणाली की, आदिल दुर्रानी याचे पहिले लग्न झाले होते हे मला आदिल दुर्रानी याने कधीच सांगितले नाही, मला हे आताच कळाले आहे. म्हणजेच माझ्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर आदिल दुर्रानी याचे लग्न झाले होते. इतकेच नाही तर पुढे राखी म्हणाली होती की, आता माझ्यानंतर त्याला तनू नावाच्या मुलीसोबतही लग्न (Marriage) करायचे आहे. आदिल दुर्रानी याने मला खूप धोका दिला असून माझे दिड कोटी रूपये त्याने घेतले आहेत. त्याने मला मारहाणही केली आहे.
नुकताच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. राखी सावंत हिने यावेळी आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
राखी सावंत म्हणाली की, आदिल दुर्रानी याने माझे न्यूड व्हिडिओही काढले आणि लोकांना विकले, या संदर्भात माझी केस सायबर क्राइम विभागामध्ये आहे. राखी सावंत हिने अत्यंत गंभीर आरोप आता केला आहे.
राखी सावंत हिने केलेले हे आरोप ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याच्यावर फसवणूक आणि घरेलू हिंसाचाराचे आरोप आहेत.
काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिच्या आईचे निधन झाले होते. यावेळी आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिच्यासोबत दिसला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्येच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक आरोप केले.
बिग बाॅस मराठीमधून बाहेर आल्यावर राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर केले होते. इतकेच नाही तर सात महिन्यांच्या अगोदरच राखी आणि आदिल दुर्रानी यांचे लग्न झाले होते.
राखी सावंत हिने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर आदिल दुर्रानी याने म्हटले होते की, मी राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न नाकारू शकत नाही आणि स्वीकारू देखील शकत नाही.