मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने बिग बाॅस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांना मोठा धक्का दिला. मात्र, त्यानंतर आदिल दुर्रानी (Adil Durrani) याने थेट राखी सावंत हिच्यासोबत झालेले लग्न नाकारू शकत नाही आणि स्वीकारू शकत नसल्याचे म्हणत सर्वांना आश्चर्यचकित केले. शेवटी राखी सावंत हिला आपल्या पत्नीच्या रूपाने आदिल दुर्रानी याने स्वीकारले. काही दिवस आदिल दुर्रानी आणि राखी अनेकदा सोबत स्पाॅट झाले. परंतु नुकताच आदिल दुर्रानी याच्यावर राखी सावंत हिने काही गंभीर आरोप केले आहेत. या दोघांच्या नात्यामध्ये सर्वकाही अवबेल नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने म्हटले होते की, आदिल दुर्रानी हा मला घटस्फोट मागत आहे. रिपोर्टनुसार आता पोलिसांनी राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
राखी सावंत ही सातत्याने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप करत आहे. राखी आणि आदिल दुर्रानी याच्यामधील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आता हे सर्व प्रकरण थेट पोलिस ठाण्यामध्ये पोहचले आहे.
राखी सावंत हिने केलेल्या तक्रारीनंतर मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी आदिल दुर्रानी याला ताब्यात घेतले आहे. राखीच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी आदिल खान याच्यावर ही कारवाई केली आहे.
राखी सावंत हिने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात पती आदिल दुर्रानी याच्यावर काही गंभीर आरोप करत तक्रार दाखल केलीये. राखीच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी चाैकशीसाठी आदिल दुर्रानी याला ताब्यात घेतलंय.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राखी सावंत ही तिचा पती आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप करत आहे. तिने आदिल दुर्रानी याच्याबद्दल मोठे खुलासे देखील केले आहेत. इतकेच नाही तर ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याने आपल्याकडून पैसे आणि दागिने घेतल्याचे देखील म्हटले आहे.
आदिल दुर्रानी हा आपल्याला सतत टॉर्चर करत असल्याचे राखी सावंत हिने सांगितले. लग्न झालेले असताना देखील बाहेर आदिल दुर्रानी याचे अनैतिक संबंध असल्याचे राखी सावंत हिने सांगितले.
यासर्व प्रकरणात चाैकशी करण्यासाठी पोलिसांनी आदिल दुर्रानी याला ताब्यात घेतले आहे. राखी सावंत हिचे लग्न झाल्यापासूनच आदिल दुर्रानी आणि तिच्यामध्ये खटके उडताना दिसत आहेत. लग्नानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म देखील स्वीकारला आहे.