मुंबई : बिग बाॅस 16 चा विजेता एमसी स्टॅन (MC Stan) अर्थात अल्ताफ शेख हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शिव ठाकरे किंवा प्रियंका चाैधरी यांच्यापैकी एकजण बिग बाॅस 16 चा विजेता होईल, असे सर्वांना वाटत असतानाच एमसी स्टॅन याने बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चा ताज जिंकला. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर अनेकांनी थेट बिग बाॅसच्या निर्मात्यांना टार्गेट करण्यास सुरूवात केली. कारण बिग बाॅस 16 च्या घरात काही खास टास्क वगैरे करताना एमसी स्टॅन कधी दिसला नाही. इतकेच नाहीतर कायमच बिग बाॅस 16 मधून बाहेर पडायचे असल्याचे म्हणताना एमसी स्टॅन हा दिसला. एमसी स्टॅन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर त्याला विचारण्यात आले होते की, बिग बाॅस 16 मधील कोणाच्या संपर्कात राहिला तुला आवडले. यावर खुलेपणाने एमसी स्टॅन म्हणाला की, मला फक्त मंडळीच्याच संपर्कात राहिचे आहे, बाकी कोणाच्याही संपर्कात मी राहणार नाहीये. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांची मैत्री चाहत्यांना प्रचंड आवडलीये.
बिग बाॅस 16 च्या घरात असताना शिव ठाकरे, साजिद खान, अब्दु रोजिक, एमसी स्टॅन, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्यामध्ये खास मैत्री बघायला मिळाली. विशेष म्हणजे बिग बाॅस 16 च्या बाहेर आल्यानंतरही यांची मैत्री कायम आहे. नुकताच बिग बाॅस 16 च्या काही सदस्यांसाठी अब्दु रोजिक याने खास पार्टीचे आयोजन केले होते.
बिग बाॅस 16 च्या घरात असताना एमसी स्टॅन कायमच त्याची गर्लफ्रेंड बूबा हिच्याबद्दल बोलताना दिसला. अनेकदा तो गर्लफ्रेंड बूबाच्या आठवणीमध्ये भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले. एक रॅपर म्हणून एमसी स्टॅन खूप जास्त चांगला असून एक प्रियकर म्हणूनही तो जबरदस्त आहे.
नुकताच एमसी स्टॅन याने त्याच्या आणि बूबा हिच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले आहे. एमसी स्टॅन म्हणाला की, मी पहिल्यांदा बूबाला चार वर्षांपूर्वी बघितले होते. आमची भेट अचानक झाली होती, मी तिच्या घरासमोर राहण्यास गेलो होतो. बघताच क्षणी मी बूबा हिच्या प्रेमात पडलो.
एमसी स्टॅन पुढे म्हणाला की, आतापर्यंत बूबाने मला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त सपोर्ट केला आहे. इतकेच नाहीतर यावेळी एमसी स्टॅन याने हेही स्पष्ट केले की, आपण बूबासोबच लग्न करणार आहोत. एमसी स्टॅन हा त्याच्या आई वडिलांवर देखील खूप जास्त प्रेम करतो. बिग बाॅस 16 नंतर एमसी स्टॅन याच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये.