मुंबई : करोडपती (Karodpati) होण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ही बातमी खास तुमच्याचसाठी आहे. ही कुठलीही लॉटरी नाही तर इथे तुमच्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता करोड रूपये… कारण सोनी मराठी (Sony Marathi) घेऊन येत आहे ‘कोण होणार करोडपती‘चं (Kon Honar Karodpati) नवं पर्व येत्या 23 फेब्रुवारीपासून. त्यामुळे करोडपती होण्यासाठी सज्ज व्हा… सोनी मराठी वाहिनीवरचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व येत्या 23 फेब्रुवारीपासून तुमच्या भेटीला येणार आहे. 14 दिवस आणि 14 प्रश्न, असं यंदाच्या पर्वाचं स्वरूप आहे. त्यामुळे तुमच्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्यासाठी तयार रहा…
‘कोण होणार करोडपती’चं नवं 23 फेब्रुवारीपासून
सोनी मराठी वाहिनीवरचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोचला आहे. सोनी मराठीवरचा ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होतंय. तुमचं ज्ञान तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व येत्या 23 फेब्रुवारीपासून तुमच्या भेटीला येणार आहे. 14 दिवस आणि 14 प्रश्न, असं यंदाच्या पर्वाचं स्वरूप आहे.
सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. मागच्या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. सचिन खेडेकर मराठी घराघरात परिचयाचे आहेत. आपली देहबोली आणि आवाज यामुळे सचिन खेडेकर यांचं सूत्रसंचालन अनेकांना आवडतं. त्यामुळे यंदाच्या या पर्वाचं सूत्रसंचालनही सचिन खेडेकरच करणार आहेत.
तुम्हीही सहभागी होऊ शकता…
‘कोण होणार करोडपती’च्या यंदाच्या पर्वाचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रत्येक खेळात कोणी जिंकतं किंवा कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो, असं सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो आला आहे. 23 फेब्रुवारी ते 8 मार्च यादरम्यान ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होण्यासाठीचे प्रश्न सुरू होतील. 14 दिवस आणि 14 प्रश्न असं याचं स्वरूप आहे. 7039077772 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्हवर नावनोंदणी करून तुम्हीही या खेळात सहभागी होऊ शकता…
संबंधित बातम्या