Bigg Boss 16 | बिग बाॅस देणार घरातील सदस्यांना मोठा झटका

| Updated on: Nov 16, 2022 | 10:05 PM

घराचा कॅप्टन सध्या साजिद खान आहे. बिग बाॅसच्या घरात प्रियंका आणि अर्चनामध्ये जोरदार हंगामा झाला आहे.

Bigg Boss 16 | बिग बाॅस देणार घरातील सदस्यांना मोठा झटका
Follow us on

मुंबई : बिग बाॅसच्या घरात मोठा हंगामा होताना दिसत आहे. साजिद खान, शिव ठाकरे, अब्दू, एमसी स्टॅन आणि सुंबुल नाॅमिनेशनपासून या आठवड्यात सुरक्षित आहेत. बिग बाॅस घरातील सदस्यांना एका टास्क देतात. त्यामध्ये हे सर्व सदस्य सुरक्षित होतात. घराचा कॅप्टन सध्या साजिद खान आहे. बिग बाॅसच्या घरात प्रियंका आणि अर्चनामध्ये जोरदार हंगामा झाला आहे. किचनमध्ये अर्चनाने प्रियंकासोबत भांडणे केली आहेत. इतकेच नाहीतर या भांडणामध्ये अर्चनाने प्रियंकाचे आई-वडील देखील काढले, यानंतर प्रियंकाने संताप व्यक्त करत किचममधील काम करण्यास नकार दिला.

या आठवड्यात टीना दत्ता, शालिन भनोट, सौंदर्या शर्मा, गाैतम विज हे सदस्य नाॅमिनेट झाली आहेत. यापैकी एक जणाला या आठवड्यात बिग बाॅसच्या घराबाहेर जावे लागणार आहे. मात्र, बिग बाॅसच्या घरातील सदस्यांना वाटत आहे की, नेहमीप्रमाणे या आठवड्यामध्येही घरातच्या बाहेर कोणीही जाणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅसच्या घरातून कोणीही बाहेर पडले नाहीये. याला फक्त गोरी अपवाद ठरली आहे. प्रियंकाने नाॅमिनेशन टास्कमध्ये डोके लावत स्वत: सुरक्षित करत अंकितलाही वाचवले आहे. बिग बाॅसच्या घरात अंकित काहीच करत नाहीये, असे अनेकांना वाटत आहेत.

टीना दत्ता, शालिन भनोट, सौंदर्या शर्मा, गाैतम विज यांच्यापैकी बिग बाॅसच्या घराबाहेर कोण पडते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. येणाऱ्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतोय, या प्रोमोमध्ये हे दिसत आहे की, सुंबुलचा बिग बाॅस चांगलाच क्लास घेत आहे.