मुंबई : रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून चाहते आतुरतेने बिग बॉस 16 ची वाट पाहत होते. बिग बॉस (Bigg Boss) शो कायमच चर्चेत असतो. यंदाचे सीजन तर निर्मात्यांनी अधिक खास बनवले आहे. बिग बॉस शोला यंदा तब्बल 15 वर्ष होत असल्याने नक्कीच हे सीजन अधिक खास ठरणार आहे. 1 ऑक्टोबर म्हणजेच आज कलर्स टीव्हीवर बिग बॉस 16 प्रीमियर होणार आहे. बिग बॉस 16 देखील सलमान खान (Salman Khan) होस्ट करतोय.
Abdu Rozik apne andaaz mein karenge aapko entertain, are you ready to welcome him to the Bigg Boss House??️
Dekhiye #BiggBoss16 kal se, raat 9:30 baje, sirf #Colors par.#BB16 #BiggBoss@BeingSalmanKhan@Chingssecret @MyGlamm #AbduRozik pic.twitter.com/fvCdEoD6sW
— ColorsTV (@ColorsTV) September 30, 2022
बिग बॉस 16 सुरू होणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह, आतुरता आणि उत्सुकता बघायला मिळत आहे. प्रेक्षकांना तब्बल तीन महिने मनोरंजनाची मेजवानी मिळणार हे नक्कीच आहे. सोशल मीडिया, बातम्या आणि चाहते यांच्यामध्ये पुढील तीन महिने फक्त आणि फक्त बिग बॉसची चर्चा होणार…
बिग बॉस 16 मुळे आरोप- प्रत्यारोपाचे सत्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे. इतकेच नव्हेतर टीव्हीवर दिसणारे आपले आवडते कलाकार भांडताना, एकमेकांवर प्रेम करताना, खेळताना आपल्याला आता लवकरच बघायला मिळणारय. बिग बॉस 16 च्या आजच्या प्रीमियरमध्ये हे स्पष्ट होईल की, बिग बॉसच्या घरात नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत.
टीव्हीवर सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 10 वाजता बिग बॉस 16 चाहते बघू शकणार आहेत. फक्त शनिवार आणि रविवार बिग बॉस 16 चे प्रसारण 9.30 ला होईल. इतकेच नाही तर Voot अॅपवर देखील चाहते हा शो बघू शकणार आहेत. आजच्या प्रीमियरमध्ये बिग बॉस 16 चे घर प्रेक्षकांना बघता येणार असून नेमके कोणते स्पर्धक बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार हेही कळले.