मुंबई : या आठवड्याचा बिग बाॅसमधील विकेंडचा वार खास ठरला. शानदार पध्दतीने 2023 चे स्वागत करण्यात आले. करण कुंद्रा याने घरात दाखल होत घरातील सदस्यांसोबत धमाल केली. इतकेच नाहीतर बिग बाॅसच्या घरात पहिल्यांदा धर्मेंद्र आले होते. यावेळी सलमान खान देखील मस्ती करताना दिसला. अगोदर सलमान खान याने घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास देखील घेतला. विकास हा नाॅमिनेशनमध्ये होता. आता विकास हा बिग बाॅसच्या घराबाहेर पडला आहे. वाइल्डकार्ड म्हणून त्याने बिग बाॅसच्या घरात प्रवेश केला होता.
बिग बाॅसच्या शोमधून काही कारणामुळे अब्दु रोजिक हा बाहेर पडला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच परत एकदा अब्दु हा घरामध्ये आलाय. परंतू यावेळी अब्दुमध्ये काही बदल घरातील सदस्यांना दिसत आहेत.
अब्दुचे घरातील मित्र शिव ठाकरे, साजिद खान, एमसी, निम्रत काैर, सुंबुल हे होते. परंतू घरात आल्यापासून अब्दु हा निम्रत काैरपासून सुरक्षित अंतर ठेवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी निम्रत मला आवडत असल्याचे अब्दुने म्हटल होते.
घरात आल्यापासून अब्दुमध्ये बदल झाल्याचे निम्रतने साजिद खान याला म्हटले होते. इतकेच नाही तर अब्दु गुड नाईट देखील निम्रतला बोलत नाहीये. आता यावर सलमान खान याने मोठे भाष्य केले आहे.
सलमान निम्रतला म्हणाला की, तुला अब्दु बोलत नाहीये, असे तू बोलताना दिसली आहे. जेंव्हा अब्दु तुला मैत्रिण मानत असल्याचे सांगत होता तरीही घरीतील सदस्य ऐकून घ्यायला तयार नव्हते.
अब्दु जेंव्हा तुला बोलत होता, त्यावेळी तू शोमध्ये दिसत होती. आता अब्दु तुला बोलत नाहीये आणि तू शोमधून गायब झाली आहेस. फक्त अब्दुमुळेच तू घराघरापर्यंत पोहचली होतीस. तू आणि अब्दुने दूर राहिलेलेच चांगले असल्याचे देखील सलमान खान म्हणाला आहे.