मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 24 डिसेंबरला तुनिशाने आत्महत्या केली आणि तीन दिवसांनी मुंबईमध्ये तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिशाने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले. तुनिशाच्या आईच्या आरोपांनंतर शीजान खान याला अटक करण्यात आली. सध्या शीजान खास हा पोलिस कोठडीमध्ये आहे. नुकताच मीडियासमोर येत तुनिशा शर्माच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले.
या आरोपांमध्ये तुनिशाच्या आईने म्हटले की, शीजान खान हा तुनिशाला बुरखा घालण्यासाठी सतत दबाव आणत होता. सेटवर जाताना देखील तिने बुरखा घालावा असे त्याचे म्हणणे होते. यामुळे दोघांमध्ये वाद व्हायचे.
यावेळी तुनिशाची आई म्हणाली की, शीजान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर नेले होते. माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली होती. शीजान याने तुनिशाला लग्नाचा वादा केल्याने ती मुस्लीमसारखी राहू लागली.
तुनिशा आणि शीजान यांच्या ब्रेकअपनंतर मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझे काहीच ऐकले नाही. तुनिशाने शीजानचा फोन चेक केला होता, त्यावेळी शीजानचे दुसऱ्या एका मुलीसोबत काही असल्याचे तिच्या लक्षात आले.
तुनिशाच्या आत्महत्येनंतर दररोज धक्कादायक खुलासे केले जात आहेत. शीजान खान हा सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. शीजानचा फोन पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडची माहिती मिळाली आहे.
पोलिसांना तुनिशाचा फोन अनलाॅक करण्यात देखील यश मिळाले आहे. यामुळे आता तुनिशाच्या फोनमधून महत्वाचे पुरावे पोलिसांना मिळण्याची दाट शकता आहे. आज शीजान खान याची पोलिस कोठडी संपणार आहे.