मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या आत्महत्येनंतर शीजान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. FIR दाखल झाल्यानंतर शीजान खान याला पोलिसांनी अटक केली. जवळपास तीन महिने तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात शीजान खान याला जेलमध्ये राहवे लागले. नुकताच शीजान खान (Sheezan Khan) याला कोर्टाकडून दिलासा मिळालाय. तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे रिलेशनशिपमध्ये होते. तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करण्याच्या फक्त पंधरा दिवस अगोदर शीजान आणि तुनिशाचे ब्रेकअप झाले होते, यामुळेच तुनिशा तणावात होती आणि तणावामध्येच तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या आईने केला.
अभिनेता शिजान खान याला आज जामीन मिळाला आहे. मात्र तो ठाणे जेलमधून रविवारी बाहेर निघेल. शिजानच्या जामीनासाठी एक लाखाच्या सिक्युरिटी बॅान्ड आणि दोन जामीनदार आवश्यक होते. मात्र, शिजान खान याच्या वकिलांनी आजच्या दिवसात 50,000 चा सिक्युरिटी बॅान्ड आणि एक जामीनदार दिला आहे तर दुसरा जामीनदार आणि 50,000 भरण्याची मुदत 13 मार्चपर्यंत घेतली आहे.
शिजान खान याची रिलीज आॅर्डर निघाली आहे. शिजान खान याची बहीण फलक नाज ही जामीनदार राहिली आहे. आज ठाणे कारागृहात रिलीज आॅर्डर दिल्यानंतर उद्या रविवारी शिजान खान सकाळी ठाणे कारागृहातून बाहेर येवू शकतो, असे सांगण्यात आलंय. मात्र, तांत्रिक अडचण काही निर्माण झाली तर सोमवारपर्यंत शिजानला ठाणे कारागृहात राहावे लागण्याची शक्यता आहे.
शीजान खान याच्या कुटुंबियांनी तुनिशा शर्मा हिच्या आईवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शीजान खान हा तुनिशा शर्मा हिला धोका देत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात कसून तपास केला आहे. अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमध्ये तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघेही मुख्य भूमिकेत होते.
मालिकेच्या सेटवरच गळफास घेत तुनिशा शर्मा हिने जीवनयात्रा संपवली आहे. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर मालिकेचे शूटिंग काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे तुनिशा आणि शीजान हे दोघेही मालिकेत मुख्य भूमिकेत होते. आता शीजान खान हा परत कधीच अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमध्ये दिसणार नाहीये. त्याला या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.