मुंबई : तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात शीजान खान याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. तुनिशा हिने मालिकेच्या सेटवरच गळफास घेतल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. याप्रकरणात तुनिशाच्या आईने अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमध्ये तुनिशासोबतच मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शीजान खान आणि तुनिशा शर्मा हे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, आत्महत्येच्या 15 दिवस अगोदरच यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते आणि यामुळेच तुनिशा ही तणावामध्ये असल्याचे तिच्या आईने सांगितले आहे.
FIR नोंदवल्यानंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केले. 24 डिसेंबरला न्यायालयाने शीजान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
यावेळी पोलिसांना शीजान खान याच्या मोबाईलमध्ये महत्वाची माहिती मिळाली. त्यानंतर 30 डिसेंबरपर्यंत शीजान खान हा पोलिस कोठडीमध्ये होता. आज परत पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले.
Tunisha death: Vasai Court sends accused Sheezan Khan to 14-day judicial custody
Read @ANI Story | https://t.co/qblKfDX91z#TunishaSharma #TunishaSharmaDeath #SheezanKhan pic.twitter.com/NsSNMOJJZ8
— ANI Digital (@ani_digital) December 31, 2022
आजही शीजान खान याला तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात दिलासा मिळाला नाहीये. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आता शीजान खान याची रवानगी करण्यात आलीये.
काल शीजान खान याच्या वकिलाने मोठा दावा करत म्हटले होते की, या प्रकरणात पोलिसांकडे काहीच पुरावे नाहीयेत. इतकेच नाहीतर तुनिशा शर्मा हिची आई पुरावे नसताना देखील आरोप करत आहे.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. शीजान खान हा तुनिशाला बुरखा घालण्यासाठी दबाव आणत असल्याचे देखील म्हटले आहे.