Shehnaaz Gill with Guru Randhawa : ‘बिग बॉस १३’ शोमधून चाहत्यांच्या भेटीस अलेली, पंजाबची कतरिना कैफ म्हणून जिने स्वतःची ओळख निर्माण केली, आज ती अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल (Shehnaaz Gill) झगमगत्या विश्वातील मोठं नाव आहे. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली. पण आज शहनात सिद्धार्थने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून आनंदी आयुष्य जगत आहे. एवढंच नाही, तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अभिनेत्री सिद्धार्थचं नाव घ्यायला विसरत नाही.
दरम्यान, शहनाजचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये शहनाज प्रसिद्ध गायक गुरु रंधावासोबत (Guru Randhawa) फोटोशूट करतना दिसत आहे. फोटोशूट करत असताना गुरू आणि शहनाजमध्ये रंगलेली केमिस्ट्री चाहत्यांना देखील प्रचंड आवडली आहे.
खुद्द गुरूने शहनाजसोबत क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, ‘तुम्हाला फक्त शहनाजला पाहण्याची परवानगी आहे.’ असं लिहिलं आहे. दोघांच्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
एका युजरने कमेंटमध्ये गुरू प्रचंड लाजाळू आहे… असं लिहिलं आहे, तर अन्य एका युजरने ‘शहनाजची क्यूटनेस कधीही कमी होणार नाही …’ असं लिहिलं आहे. सध्या गुरू आणि शहनाजच्या खास व्हिडीओला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
शहनाजचा आगामी सिनेमा
शहनाज लवकरच अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शहनाजला सिनेमात मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या सर्वत्र शहनाजच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच मनोरंजन करणारी शहनाज सिनेमात चाहत्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.