मुंबई : बिग बाॅस 16 ने टीआरपीमध्ये मोठा धमाका केला. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) च्या सीजनने प्रेक्षकांचे फुल मनोरंजन केले. विशेष म्हणजे आता बिग बाॅस 16 चा फिनाले होऊन इतके दिवस झाले असतानाही बिग बाॅस 16 च्या घरातील सदस्य पार्टी करताना सतत दिसत आहेत. बिग बाॅस 16 च्या फिनालेनंतर सलमान खान याने बिग बाॅस 16 च्या सर्व सदस्यांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. यानंतर फराह खान हिने देखील पार्टीचे आयोजन केले. या दोन्ही पार्टीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो (Photo) सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये बिग बाॅस 16 तील सर्वच सदस्य धमाल करताना दिसले.
बिग बाॅस 16 चा विजेता एमसी स्टॅन हा झालाय. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. कारण बिग बाॅस 16 मध्ये काही खास गेम खेळताना एमसी स्टॅन हा कधी दिसला नाही. मात्र, जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग असल्याने एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला.
बिग बाॅस 16 मध्ये एक खरी मैत्री बघायला मिळाली. शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टॅन, अब्दू रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्यामध्ये खास मैत्री होती. विशेष म्हणजे मंडलीपैकीच एकजण बिग बाॅस 16 चा विजेता व्हावा असे हे सर्वजण म्हणताना दिसले आणि मंडलीमधील एमसी स्टॅन हाच विजेता झाला.
शिव ठाकरे हा बिग बॉस 16 रनर-अप ठरला. बिग बॉस 16 चा ताज थोडक्यात शिव ठाकरे याचा हुकला. मात्र, बिग बॉस 16 नंतर आता शिव ठाकरे याचे नशीब बदलल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने 30 लाखांची एक आलिशान कार खरेदी केली. ही कार खरेदी केल्यानंतर शिव ठाकरे म्हणाला की, मी पाहिलेले एक मोठे स्वप्न पूर्ण झाले.
आता 30 लाखांची कार घेतल्यानंतर शिव ठाकरे याने एक मोठा व्यवसाय सुरू केलाय. विशेष म्हणजे त्याच्या या व्यवसायाच्या उद्धाटनाला क्रिकेटचा देव अर्थात कपिल देव हे उपस्थित होते. आता या कार्यक्रमातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते शिव ठाकरे याला शुभेच्छा देत आहेत.
शिव ठाकरे याने ‘ठाकरे चहा आणि नाश्ता’ नावाचे नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे, ज्याचे उद्धाटन नुकताच करण्यात आले आहे. यावेळी कपिल देव देखील उपस्थित होते. यावेळी शिव ठाकरे म्हणाला की, मी माझ्या रेस्टॉरंटची सुरूवात ही मुंबई आणि पुण्यात करतोय….त्यानंतर मी अमरावतीमध्येही रेस्टॉरंट सुरू करणार आहे.