मुंबई : ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. मात्र त्यावरुन डॉक्टरांमध्ये मतभेद असून कुठलाच अंतिम निष्कर्ष काढला गेला नसल्याची माहिती आहे. यानंतर आता त्याचे पार्थिव घराच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे.
सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून ब्रह्मा कुमारी जुहू कार्यालयात नेण्यात येईल, तिथे पूजा केल्यानंतर त्याचे पार्थिव ओशिवारा भागातील घरी आणले जाईल. या नंतर दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. सिद्धार्थ शुक्लाच्या घराबाहेर पोलीस तसेच खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
सिद्धार्थ शुक्लाच्या शव विच्छेदनानंतर डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. व्हिसेरा संरक्षित करण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण हिस्टोपॅथोलॉजिकल अहवालानंतरच उघड होईल. शरीरावर कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत जखमा नाहीत.
मीडिया रीपोर्टनुसार, सिद्धार्थ शेवटच्या वेळी रात्री आईसोबत फिरताना दिसला होता. सिद्धार्थने खुप वेळा सांगितले होते की, तो त्याच्या आईच्या खूप जवळ आहे.
सिद्धार्थने 2014 मध्ये ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत वरूण धवन आणि आलिया भट्ट होते. सिद्धार्थ शुक्ला ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात वरूण धवन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसले होते. ही बातमी ऐकून वरुण धवन सिद्धार्थ शुक्लाच्या घरी गेला होता. वरुण व्यतिरिक्त राजकुमार राव, असीम रियाज, आरती सिंह, रश्मी देसाई, जयभानुशाली असे सगळे स्टार्स अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते.
पोलिसांच्या मते, सिद्धार्थ बुधवार संध्याकाळपर्यंत ठीक होता आणि रात्री 3-4 वाजता अभिनेत्याला थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्याने थंड पाणी मागितले आणि झोपी गेला. त्यानंतर पुन्हा सकाळी त्याने छातीत दुखण्याची तक्रार केली आणि पाणी मागितले. पाणी पिताना तो अचानक बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.
अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 स्पर्धकांना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
संबंधित बातम्या:
झोपण्यापूर्वी गोळ्या घेतल्या, गाडीची काचही फुटलेली, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्लासोबत काय काय घडलं?
शहनाजला करायचं होतं सिद्धार्थ शुक्लाशी लग्न, बिग बॉस 13च्या ‘या’ माजी स्पर्धकानं केला खुलासा