मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (2 सप्टेंबर) निधन झाले. त्याच्या जाण्यामुळे टीव्ही आणि चित्रपट विश्व दुःखात आहेत. सिद्धार्थवर आज मुंबईच्या ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे अभिनेत्याचे अंतिम संस्कार ब्रह्मकुमारींच्या रीतिरिवाजानुसार केले जातील. सिद्धार्थ आणि त्याची आई अनेक वर्षांपासून ब्रह्मकुमारी केंद्राशी संबंधित आहेत. सिद्धार्थ अनेकदा ब्रह्मकुमारी केंद्राला भेट देत असे.
एका वृत्तवाहिनीने एका ब्रह्मकुमारी तपस्विनीसोबत विशेष बातचीत केली आणि सिद्धार्थ शुक्ल यांचे ब्रह्मकुमारी विधीनुसार अंत्यसंस्कार कसे केले जातील, अभिनेत्याचा शेवटचा प्रवास कसा असेल? हे जाणून घेतले. तथापि, कोव्हिड प्रोटोकॉल लक्षात घेता, अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये काही बदल केले जाऊ शकतात.
ब्रह्माकुमारी तपस्विनी यांनी सिद्धार्थच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्याच्या शेवटच्या प्रवासाच्या विधीमध्ये, त्याच्या अमर आत्म्याच्या शांतीसाठी,आम्ही सर्व तेथे जाऊन ध्यान करू आणि त्याच्या पार्थिव शरीराला तिलक लावला जाईल. चंदनाचा हार आणि फुलांचा हार घातला जाईल. प्रत्येकजण ओमचा जप करेल. ध्यान करून त्याच्या आत्म्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जातील. त्याला श्रद्धांजली, पुष्पहार आणि स्नेहांजली दिली जाईल. सगळ्या विधी अशा प्रकारे केल्या जातील. सिद्धार्थच्या निधनामुळे आपण सर्वजण दु:खी आहोत. तो आमचा लाडका भाऊ होता, असंही त्या म्हणाल्या.
अभिनेत्याची स्तुती करताना त्या म्हणाल्या की, तो एक चांगला आणि उदात्त व्यक्ती होता. तो ध्यानाचा सराव करायचा. त्याने आमच्या 7 दिवसांच्या कोर्सचाही अभ्यास केला. आम्ही आमच्या रोजच्या प्रवचनाचा अभ्यास करायचो आणि तो ते आपल्या जीवनात लागू करायचा. यामुळे तो नेहमी ब्रह्मकुमारी केंद्राशी संबंधित होता. रक्षाबंधनाला सिद्धार्थ इथे आला होता.
‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. मात्र त्यावरुन डॉक्टरांमध्ये मतभेद असून कुठलाच अंतिम निष्कर्ष काढला गेला नसल्याची माहिती आहे. यानंतर आता त्याचे पार्थिव घराच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून ब्रह्मा कुमारी जुहू कार्यालयात नेण्यात येईल, तिथे पूजा केल्यानंतर त्याचे पार्थिव ओशिवारा भागातील घरी आणले जाईल. या नंतर दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. सिद्धार्थ शुक्लाच्या घराबाहेर पोलीस तसेच खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
झोपण्यापूर्वी गोळ्या घेतल्या, गाडीची काचही फुटलेली, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्लासोबत काय काय घडलं?
शहनाजला करायचं होतं सिद्धार्थ शुक्लाशी लग्न, बिग बॉस 13च्या ‘या’ माजी स्पर्धकानं केला खुलासा