मुंबई : बिग बाॅस 16 मध्ये एक नाव प्रचंड चर्चेत आले ते म्हणजे अब्दू रोजिक (Abdu Rozik) याचे. अब्दू रोजिक याला भारतामध्ये खरी ओळख ही बिग बाॅसमुळे मिळालीये. बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर अब्दू रोजिक याच्या चाहत्यांमध्ये वाढ झालीये. बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात असताना अब्दू रोजिक हा धमाल करताना दिसला. अब्दू रोजिक, साजिद खान, शिव ठाकरे, निम्रत काैर, सुंबुल ताैकीर आणि एमसी स्टॅन (MC Stan) यांची मैत्री चाहत्यांना प्रचंड आवडली. आता बिग बाॅसचा फिनाले होऊन बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, असे असताना देखील अब्दू रोजिक हा प्रचंड चर्चेत आहे. मात्र, नुकताच अब्दू रोजिक हा मोठ्या वादात अडकलाय.
काही दिवसांपूर्वी अब्दू रोजिक याने मुंबईतील अंधेरी भागामध्ये स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. अब्दू रोजिक याच्या हाॅटेलच्या ओपनिंगला अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. एकदम जबरदस्त असे ओपनिंग या हाॅटेलचे अब्दू रोजिक याने ठेवले होते. या हाॅटेलच्या ओपनिंगचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सतत व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अब्दू रोजिक याचे चाहते नाराज झाले. इतकेच नाही तर या व्हिडीओमुळे चक्क अब्दू रोजिक याच्या विरोधात मुंबईत गुन्हा देखील दाखल केल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अब्दु रोजिक बंदूक लोड करताना दिसत आहे. आता गुन्हा दाखल झाल्याच्या चर्चांवर अब्दू रोजिक याने माैन सोडले आहे.
अब्दू रोजिक याने या प्रकरणात एक पत्र सोशल मीडियावर शेअर करत मोठा खुलासा केला आहे. अब्दू रोजिक म्हणाला की, दु:खाची गोष्ट आहे आणि भारतामधील माझा हा पहिला वाईट अनुभव आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी ज्याला हाॅटेलच्या ओपनिंगला बोलावले नव्हते तोच व्यक्ती मला बदनाम करत आहे.
माझ्यावर खोटे आरोप करत माझे नाव आणि माझा व्यवसाय खराब करण्याचा हा सर्व प्रयत्न सुरू आहे. अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका असे देखील अब्दू रोजिक याने म्हटले आहे. माझ्या विरोधात लोकांना भडकवण्याचे काम सुरू आहे. तुम्हाला जे सांगितले जात आहे ते सर्वकाही चुकीचे असल्याचे देखील अब्दू रोजिक याने म्हटले आहे.
अब्दू रोजिक म्हणाला, मी कधीच कोणाला नुकसान पोहचवू शकत नाही. ज्यावेळी हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे, त्यावेळी अनेक मोठे लोक तिथे उपस्थित होते आणि विशेष म्हणजे ते यावर गवाही देण्यासही देखील तयार आहेत. यामध्ये अब्दू रोजिक याने स्पष्ट सांगितले आहे की, त्याच्या विरोधात कोणतीच तक्रार दाखल करण्यात नाही आली.