मुंबई : बिग बाॅसचे हे 16 वे सीजन प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करताना दिसत आहे. घरामध्ये दररोजच मोठे हंगामे होताना दिसत आहेत. फक्त अंकिता गुप्ता सोडून इतर सर्वच सदस्य घरामध्ये भांडणे करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच श्रीजिता डे ही परत एकदा बिग बाॅसच्या घरामध्ये सहभागी झालीये. बिग बाॅसच्या घरात श्रीजिता आणि टीना दत्ता यांच्यामध्ये खटके उडताना सातत्याने दिसत आहे. विशेष बाब म्हणजे बिग बाॅसच्या घरात सहभागी होण्यापूर्वी टीना आणि श्रीजिता या अत्यंत चांगल्या मैत्रिणी होत्या.
श्रीजिता डे ही परत बिग बाॅसच्या घरात सहभागी होणार असल्याचे कळाल्यावरच टीना दत्ता हिने आपला राग व्यक्त केला होता. श्रीजिता डे ही सध्या बिग बाॅसच्या घरात कॅप्टन आहे. परंतू श्रीजिता डे हिने सांगितलेले काम टीना करत नाही.
काही दिवसांपूर्वी विकासला बोलताना टीना दत्ता हिने श्रीजिताच्या घराचा पत्ता सांगून टाकला होता. यानंतर श्रीजिता डेच्या होणाऱ्या नवऱ्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली होती.
आता साैंदर्या शर्मा हिच्यासोबत बोलत असताना श्रीजिता डे ही टीना दत्ताबद्दल असे काही सांगते की, हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नुकताच बिग बाॅसचा एक प्रोमो व्हायरल झालाय. यामध्ये श्रीजिता ही टीनावर गंभीर आरोप लावते.
श्रीजिता म्हणते की, या टीनाला मी खूप चांगल्याप्रकारे ओळखते. ही मुलांचे अटेंशन घेतल्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. इतकेच नाहीतर हिने कितीतरी लोकांचे घर तोडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ही अजूनही स्वत:चे घर बसू शकली नाहीये.
आता हाच प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. श्रीजिता डे हिचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. घरामध्येही टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्या नात्याबद्दल सतत चर्चा रंगताना दिसते.